Anant Karmuse Case | अनंत करमुसे प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का, पोलिसांकडून आव्हाडांचा पीए तडीपार

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनंत करमुसे प्रकरणात (Anant Karmuse Case) राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांना मोठा धक्का बसला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या पीएला तडीपार करण्यात आले आहे. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अनंत करमुसे प्रकरणात (Anant Karmuse Case) पोलिसांनी आव्हाडांचे पीए अभिजीत पवार (PA Abhijit Pawar) याला ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून तडीपार (Tadipar) केले आहे. पवार याच्या विरोधात करमुसे मारहाण तसेच इतर काही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ठाणे पोलिसांकडून (Thane Police) ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड यांचे पीए अभिजित पवार यांच्यावर ठाणे पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. ठाणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरण ( Anant Karmuse Case) आणि इतर काही प्रकरणात गुन्हे पवार याच्यावर (Thane Crime News) दाखल आहेत. त्यामुळे पवार याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

काय आहे प्रकरण?

अनंत करमुसे यांनी सोशल मीडियावर आमदार जितेंद्र आव्हाडांचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले होते.
त्यानंतर 5 एप्रिल 2020 ला अनंत करमुसे यांना मारहाण करण्यात आली होती.
जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पोलीस तसंच बॉडिगार्डनी आपल्याला बंगल्यावर नेऊन मारहाण केल्याचा आरोप
करमुसे यांनी केला होता. यानंतर 6 एप्रिलला करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दिली होती.
त्यामुळे आव्हाड हे चांगलेच अडचणीत सापडले होते.

Web Title :-  Anant Karmuse Case | thane police action against jitendra awhads pa in anant karamuse case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | राज्यात दंगली घडवणाऱ्यांना अद्दल घडवणार, देवेंद्र फडणवीसांचा इशारा (व्हिडिओ)

Sameer Wankhede | ‘आर्यन खान प्रकरणात 25 कोटी उकळण्याचा डाव’, सीबीआयचा FIR मध्ये मोठा खुलासा