शहीद मेजर केतन शर्मा यांचा ‘तो’ शेवटचा व्हॉट्सअ‍ॅप ठरला खरा

मेरठ : वृत्तसंस्था – दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील मेजर केतन शर्मा शहीद झाले. शहीद केतन शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअ‍ॅपवर फोटोसह एक मेसेज पाठवला होता. तो त्यांचा शेवटचा मेसेज ठरला. हा फोटो शेअर केल्याच्या काही तासातच अनंतनागमधील चकमकीत केतन शर्मा शहीद झाल्याचं वृत्त आलं होतं.

सोमवारी सकाळी सात वाजता फोटो आपल्या कुटुंबाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये पाठवला होता. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं होतं की, कदाचित हा माझा शेवटचा फोटो असेल. मेजर केतन शर्मा यांनी जेव्हा त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप मेसेज केला होता, तेव्हा त्यांच्या पत्नीने रिप्लाय केला होता. मात्र त्यावर त्यांचा रिप्लाय आला नाही. त्यानंतर त्यांची जखमी झाल्याची माहिती मिळाली. दुपारी साडेतीनच्या सुमारास सैन्यातील अधिकाऱ्यांनी केतन शर्मा शहीद झाल्याचं सांगितलं.

मूळचे मेरठचे असलेल्या ३२ वर्षीय मेजर केतन शर्मा. २०१२ साली लष्करात भरती झाले होते. ते १९ राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते. २७ मे रोजी सुट्टी संपल्यानंतर ते पुन्हा काश्मीरात गेले होते. केतन शर्मा यांच्यामागे कुटुंबात पत्नी इरा मंदर शर्मा, चार वर्षांची मुलगी कायरा, आई-वडील आणि एक धाकटी बहिण आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन