370 हटवल्यानंतर 2 महिन्यांनी दहशतवाद्यांचा भारतीय सैन्यावर ग्रेनेड हल्‍ला, 10 गंभीर जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर 2 महिन्यांनी अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी दहशतवाद्यांनी अनंतनागमधील डीसी ऑफिसला लक्ष केले. दहशतवाद्यांकडून अनंतनागमधील डीसी ऑफिसवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.

या सर्वांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. असे सांगितले जात आहे की, दहशतवाद्यांनी डीसी ऑफिसच्या गेटवर तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांवर ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात जखमी झालेल्या 10 जणांंमध्ये ट्राफिक पोलीस आणि पत्रकारांचा देखील समावेश आहे. याशिवाय या जखमींमध्ये 12 वर्षांच्या मुलाचा देखील समावेश आहे.

या हल्ल्यानंतर परिसरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे, पोलिसांनी घटनास्थळाला आणि परिसराला घेराव घातला आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे.

visit : Policenama.com