Advt.

Ananya Pandey | अनन्या पांडेचं सोशल मीडियावर ‘कमबॅक’, शेअर केला जबरदस्त व्हिडिओ

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दुरावली होती. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अनन्या पांडेचं (Ananya Pandey) नाव समोर आल्याने तिला समनस पाठवून तिची चौकशी करण्यात आली होती. यानंतर अनन्याने सोशल मीडियावर एकही फोटो शेअर केला नव्हता.

ड्रग्ज प्रकरणी अडचणीत आलेल्या आनन्या पांडेने (Ananya Pandey) तिच्या वाढदिवसादिवशी (Birthday) देखील कोणताही फोटो शेअर केला नाही. तसेच पार्टी किंवा सेलिब्रेशनचे फोटो देखील समोर आले नव्हते. मात्र अनन्याने नुकताच व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या मागील निसर्ग दाखवत असल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

शेअर केलेल्या व्हिडिओला ‘पावसाशिवाय इंद्रधनुष्य दिसत नाही’ (You can’t have a rainbow without little rain) असं कॅप्शन तिने दिलं आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे तर ड्रग्ज प्रकरणाबाबत तिला ट्रोल करण्यात आलं आहे. अनन्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिने तिची बहिण अलानाच्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे.

 

 

 

अनन्या शेवट ‘खाली पिली’ (Khali-Pili) या चित्रपटात अभिनेता ईशान खट्टरसोबत (Ishaan Khattar) दिसली होती. या चित्रपटाला लॉकडाऊन दरम्यान ओटीटी प्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या चित्रपटाला दर्शकांची चांगली प्रतिक्रिया देखील मिळाली. लवकरच आनन्या ‘खो गये हम कहा’ (Kho Gaye Hum Kaha) या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय चित्रपट लाईगर (Liger) मध्ये देखील ती विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

हे देखील वाचा

High Court | परवानगी शिवाय दुसरा विवाह करणारा शिक्षेस पात्र, जाणून घ्या हायकोर्टानं नेमकं काय म्हंटलंय

Mumbai Police | कौतुकास्पद ! नाल्यातून वाहत जात होतं ‘नवजात’ बाळ, ‘म्याव-म्याव’ करून मांजरांनी केलं अलर्ट, मुंबई पोलिसांनी अर्भकाला वाचवलं

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ananya Panday | ananya panday first post after Aryan Khan drugs case controversy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update