Video : …म्हणून अनन्या पांडेला थेट भिडली फीमेल फॅन ! अभिनेत्रीनं केलं ‘असं’ काही

आपल्या आवडत्या सेलेब्रिटीसोबत फोटो घेताना चाहत्यांचे अनेक कॉमेडी किंवा विचित्र किस्से समोर येत असतात. बॉलिवूड स्टार अनन्या पांडे (Ananya Panday) सोबतही एक विचित्र घटना घडली आहे. याचा एक व्हिडीओ देखील सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

अनन्या नकतीच बाहेर चालली होती. तिची टीमही सोबत होती. यावेळी एक फीमेल फॅन तिच्यासोबत फोटो काढण्यासाची जवळ गेली. तिला मनाई केली असता ती जबरदस्तीनं फोटो काढण्याचा प्रयत्न करू लागली. हे पाहून अनन्याच्या टीमनं तिला दूर करण्याचा प्रयत्न केला. तरीही ती महिला परत अनन्याकडे गेली आणि ती अनन्याला तिचं कार्ड देऊन म्हणाली माझ्या शोरूमवर एकदा येऊन जा.

अनन्याचा आणि या चाहतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अजूनही हा व्हिडीओ सोशलवर चाहत्यांकडून शेअर केला जाताना दिसत आहे.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एका सिनेमात अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. फायटर असं या सिनेमाचं नाव आहे. इतकंच नाही तर ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. यात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिकेत आहेत. अनन्यानं स्टुडेंट ऑफ द ईयर 2, पती, पत्नी और वो, खाली पीली अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.