अनन्या पांडे ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात ; स्वत:च केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन यांच्या लिंकअपच्या बातम्या अनेकदा चर्चेत होत्या. अशातच आत अनन्याने खुलासा केला आहे की ती नेमकी कोणत्या अभिनेत्याच्या प्रेमात आहे. अनन्या पांडे ही वरुण धवनच्या प्रेमात आहे असे तिने स्वत: सांगितले आहे.

एका मुलाखतीत बोलताना अनन्याला विचारण्यात आले की, ती कोणत्या अ‍ॅक्टर्स सोबत काम करण्यास उत्सुक आहे यावर उत्तर देताना अनन्या म्हणाली की, “आलिया भट्ट आणि करीना कपूर खान. मी या दोघींपासून खूप प्रभावित आहे.” असे म्हणत पुढे अनन्या म्हणाली की, “मी वरुण धवनपासूनही प्रभावित आहे. त्याची एनर्जी…. तो खूपच क्युट आहे. त्याला माहिती आहे की, मी त्याच्यावर प्रेम करते. आणि हे थोडं विचित्र आहे.” वरुण धवनच्या वाढदिवशी देखील अनन्याने खास शुभेच्छा देत वरुणला शुभेच्छा दिल्या होत्या. वरुणसोबतचा फोटोही तिने शेअर केला होता.

तुम्हाला सांगू इच्छितो की, कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांच्या फार पूर्वीपासूनच डेटींगच्या चर्चा सुरु आहेत. दोघांना अनेकदा डिनर डेट्स आणि अनेक पार्ट्यांमध्ये एकमेकांसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. परंतु या चर्चा किती सत्य आणि किती खोट्या आहेत याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आपल्या ड्रिम डेब्यू बाबत बोलताना अनन्या म्हणाली की, “मी स्टुडेंट ऑफ द ईयर 2 या सिनेमाने इतकी प्रभावित झाले होते की, मी त्याला माझ्या जीवनात आमलात आणलं. ही सिनेमा 10 मे रोजी रिलीज होणार आहे.