Ananya Pandey | अनन्या पांडे न्यूयॉर्कमध्ये करतेयं धमाल, शेअर केले फोटो

0
194
Ananya Pandey | ananya panday share her latest new york trip photos goes viral on social media bollywood news
file photo

पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Bollywood Actress Ananya Pandey) ही इंडस्ट्रीतील अशा बाल अभिनेत्रींपैकी एक आहे.अनन्या पांडे ही आपल्या अभिनयासह क्यूटनेससाठी (Ananya Pandey Cute Photo) ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये अगदी कमी वेळातच तिने स्वतः अस्तित्व निर्माण केलं आहे. तिच्या कामासोबतच अनन्या तिच्या स्टाईल आणि ड्रेसिंग (Ananya Pandey Style and Dressing) सेन्ससाठीही ओळखली जाते. अभिनयासोबतच अनन्या (Actress Ananya Pandey) सोशल प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय आहे.दरम्यान अशातच कामातून ब्रेक घेऊन अनन्या पांडे सध्या न्यू यॉर्कमध्ये फुरसतीचा वेळ घालवत आहे. ‘खली पीली’ अभिनेत्री अनन्या पांडेने बुधवारी तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर न्यूयॉर्कच्या सुट्टीतील (Ananya Pandey New York holidays) अनेक छायाचित्रे शेअर केली. यामध्ये ती खुप मजा करत असल्याच दिसुन येत आहे.अनन्याचे लेटेस्ट फोटो (Ananya Pandey New York Latest photo) व्हायरल होत आहेत.

 

पहिल्या चित्रात तिच्या हातात कॉफीचा मग आहे आणि ती कॉफी पितानाचा आनंद लुटताना दिसत आहे. तर दुसर्‍या फोटोमध्ये, ती हातात दुसर्‍या ड्रिंकचा ग्लास घेऊन न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे.याशिवाय एका फोटोत तर तिच्यासोबत इतरही अनेक लोक दिसत आहेत. ज्यापैकी एक तिला तिच्या हाताने काहीतरी खायला घालताना दिसत आहे. तर बाकीचे तिच्या मेकअपमध्ये व्यस्त आहेत. हे फोटो पोस्ट करत अनन्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “न्यूयॉर्कमध्ये ४८ तास आणि यापेक्षा चांगले काही नाही.”

आता अनन्या पांडेच्या कामाबाबत बालायच झाल तर, अनन्या पांडे यापुढे आयुष्मान खुरानासोबत कॉमेडी-ड्रामा चित्रपट ड्रीम गर्ल 2 मध्ये दिसणार आहे.
तसेच हा चित्रपट आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा अभिनीत ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाचा सीक्वल असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान त्याचबरोबर ‘ड्रीम गर्ल’ची कथा आधीच्या चित्रपटापेक्षा खूपच वेगळी असेल, असा दावाही केला जात आहे.
याशिवाय अनन्या पांडे आदर्श गौरव आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत ‘खो गये हम कहाँ’मध्येही दिसणार आहे,
जी तीन तरुणांभोवती फिरताना दिसणार आहे. तसेच अनन्या पांडे ही तिच्या बॉलिवूड करिअरसह खासगी आयुष्यात देखील चर्चेत असते.
दरम्यान अनेक वेळा ती वादाच्या भोवऱ्यात देखील सापडली आहे.
तसेच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेच देखील नाव आलं होतं.

 

Web Title :- Ananya Pandey | ananya panday share her latest new york trip photos goes viral on social media bollywood news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anushka Sharma | अनुष्का शर्माने साडी नेसून चाहत्यांना घातली भुरळ, फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल

Gold and Silver Price | सोने पुन्हा महागले, पहा तुमच्या शहरातील किंमती

Shweta Sharma | उर्फी जावेदलाही मागे टाकतेयं ‘ही’ भोजपुरी अभिनेत्री, व्हायरल होत आहे बोल्ड व्हिडिओ

Pune Metro | लवकरच सुरु होईल पुणे मेट्रोचे भुयार; फक्त स्थानकांचे काम राहिले