अनन्या पांडेनं अवॉर्ड फंक्शनमध्ये दाखवला फॅशनचा ‘जलवा’, फोटो पाहून चाहते ‘क्रेझी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार अनन्या पांडे आपल्या बोल्ड लुकमुळं नेहमीच चर्चेत असते. अनन्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. शुक्रवारी अनन्या झी सिने अवॉर्डमध्ये सहभागी झाली होती. यावेळी आपल्या लुकनं तिनं साऱ्यांचं अटेंशन घेतलं.

अनन्यानं तिच्या चाहत्यांसाठी इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. ब्लॅक ऑफ शोल्डर घातलेली अनन्या खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत होती. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं होतं. फोटो शेअर करताना अनन्या म्हणते, “नेहमी ब्राईट साईड पहायला हवी.” अनन्याच्या शेअर केलेल्या फोटोंप्रमाणेच तिनं दिलेलं कॅप्शनही सुंदर आहे.

अनन्याच्या फोटोंना काही तासांतच 9 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनन्याच्या लाईक्सवरूनच लक्षात येतं की, ती सोशल मीडियावर किती फेमस आहे. चाहत्यांकडून तिच्या फोटोंना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडासोबत आपल्या एका सिनेमाला घेऊन सध्या ती चर्चेत आहे. अलीकडेच विजय आणि अनन्या रात्री उशीरा बाईकवर फिरताना स्पॉट झाले होते. या सिनेमाचं नाव फायटर आहे. दोघंही या सिनेमाबद्दल खूप एक्सायटेड आहेत. याशिवाय अनन्या ईशान खट्टर सोबत खाली पीली या सिनेमात काम करताना दिसणार आहे. मकबूल खान दिग्दर्शित हा सिनेमा 12 जून 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.