कार्तिक, सारा आणि अनन्याच्या लव ट्रँगलबाबत अनन्याचा मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कार्तिकसोबतच्या नात्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे. या दोघांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यास नेहमीच उत्सुक असतात. अनेकदा त्यांचे अफेअर अल्याची चर्चा समोर आली आहे. इतकेच नाही तर कार्तिक आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे यांच्याबद्दलही अनेकदा बोललं गेलं आहे. कार्तिक सारा आणि अनन्या यांच्यात लव ट्रँगल आहे असे बोलले गेले आहे. या सगळ्यावर आता अनन्या पांडेने भाष्य केले आहे. त्यांच्यात लव ट्रँगल नसल्याचं तिने म्हटलं आहे.

अनन्या म्हणते की, “सारा अली खान, कार्तिक आर्यन आणि माझ्यात कोणताही लव ट्रँगलन नाही. मी आता केवळ 20 वर्षांची आहे. कोणावर क्रश होत असेल तर ती कॉमन गोष्ट आहे. हे क्रश कोणत्याही वेळी बदलू शकतं. त्यामुळे हे सगळं म्हणजे केवळ एक गंमत आहे. प्रत्येकजण यामुळे मजा घेत आहे.” असे अनन्या म्हणाली.

स्टडंट ऑफ द इयर 2 या सिनेमात अनन्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. या सिनेमात ती टायगर श्रॉफ आणि तारा सुतारीयासोबत दिसली होती. परंतु 10 मे रोजी रिलीज झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नाही.