‘फिल्मफेअर’ अवॉर्डबद्दल अनन्या पांडेचा खुलासा, म्हणाली – ‘रात्रभर सराव करून देखील विसरले विनिंग स्पीच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अनन्या पांडे सध्या सातव्या आसमानावर आहे. आपला डेब्यू सिनेमा स्टुडेंट ऑफ द ईयर 2 साठी तिला बेस्ट डेब्यूचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. तिच्या आनंदाला पारवारा उरल नाही असं दिसत आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच फिल्मफेअर अवॉर्ड मिळणं ही अनन्यासाठी मोठी गोष्ट आहे. तिचे वडिल चंकी पांडेला ही ट्रॉफी कधीच मिळाली नाही. परंतु अनन्यानं मात्र ही ट्रॉफी मिळवून कमाल केली आहे.

विनिंग स्पीच विसरली होती अनन्या पांडे
जेव्हा अनन्याला अवॉर्ड मिळाला तेव्हा तिनं आपला अनुभव सांगितला. एका मुलाखतीत बोलताना अनन्या म्हणाली की, “मी विनिंग स्पीच बोलण्याची खूप प्रॅक्टीस केली होती. परंतु स्टेजवर पोहोचल्यानंतर मात्र मी सगळं विसरून गेले. फिल्मफेअर जिंकणं माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. माझी आई त्यावेळी माझ्यासोबत होती. परंतु पप्पा काही करणानं आले नव्हते. परंतु घरी पोहोचताच मी माझी ट्रॉफी त्यांना दिली होती.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अनन्या पांडे लवकरच खाली पीली सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात ती ईशान खट्टर सोबत काम करणार आहे. मकबूल खान दिग्दर्शित हा सिनेमा 12 जून 2020 रोजी रिलीज होईल अशा प्रकारे तयारी सुरू आहे.

View this post on Instagram

#IshaRah 🖤✨

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

View this post on Instagram

left u on red 🌶

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

View this post on Instagram

looking for my yellow paint 🎨 #Umang2020 💛

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

View this post on Instagram

only my team can make me smile so big 😁

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like