सारा अली खान नंतर ‘या’ अभिनेत्रीचाही कार्तिक आर्यनवर क्रश असल्याचा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोनू के टीटू की स्वीटी हा सिनेमा केल्यानंतर अभिनेता कार्तिक आर्यनच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले. कार्तिक आर्यन लाखो काळजाची धडकन बनला. बॉलिवूडमधीलही अनेक अभिनेत्री त्याच्यावर फिदा आहेत. सारा अली खानने तर खूप आधीच करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये कार्तिक आर्यनसोबत डेटवर जाण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवले होते. आता आणखी एका अभिनेत्रीने सांगितले आहे की, कार्तिक आर्यन हा तिचा क्रश आहे. त्या अभिनेत्रीचं नाव आहे चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे.

अनन्याने स्वत: कार्तिकवर आपलं क्रश असल्याचं सांगितलं आहे. अनन्या म्हणाली की, “माझं वय आता 20 आहे. या वयात कोणावर क्रश होणं ही एक सामान्य बाब आहे. मी माझ्या भावना कोणतीही लाज न बाळगता स्पष्ट सांगत असते. मला कार्तिक खूपच क्युट वाटतो. मी खूप भाग्यवान आहे की, मला त्याच्या सोबत काम करण्याची संधीदेखील मिळाली आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सारा आणि कार्तिक आर्यन लवकरच लव आजकल 2 या सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो की, अनन्या पांडे स्टुडेंट ऑफ द इयर 2 या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. या सिनेमात तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफदेखील प्रमुख भूमिकेत असणार आहेत. पुनीत मल्होत्रा हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.