शाहरुख खानला ‘ही’ अभिनेत्री मानते आपले ‘डॅडी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा किंग खान हा सगळ्यांचा बादशाह आहे. खुप काळ तो बॉलिवूडमध्ये टिकला आहे. त्याचे लाखो चाहते आहे. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी असून अजुन एक अभिनेत्री शाहरुख खानला आपला वडील मानते. हि अभिनेत्री कोण ? जाणून घेऊया…..

अभिनेत्री अनन्या पांडे हीने नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. बॉलिवूड मध्ये पाऊल टाकताच तिचा चाहता वर्ग वाढला. अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. ती शाहरुख खानला सुद्धा आपला वडील मानते.

 

शाहरुख खानची मुलगी आणि अनन्या पांडे खूप जवळच्या मैत्रिणी आहे. एका मुलाखतीत अनन्या म्हणाली, बॉलिवूडमध्ये अनेक लोक माझे क्लोज आहे. मात्र, शाहरुख खान स्पेशल आहे. शाहरुख खानला मी वडिलांच्या ठिकाणी समजते. माझे वडिल चंकी पांडे आणि शाहरुख खान सुद्धा बेस्ट फ्रेंड आहेत.

 

नुकताच आलेला चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मध्ये अनन्या पांडेने पदार्पण केले आहे. तिचे चित्रपटातील भूमिकेचे चाहत्यांनी कौतुक केले आहे. अनन्या लवकरच ‘पती, पत्नी और वो’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर असणार आहे. राजा चोप्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ७० दशकातील हा चित्रपट विवाहबाह्य संबधांवर आधारित असलेल्या या सिनेमाला चांगला प्रतिसाद लाभला होता. १८७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर यानी काम केले होते.

या चित्रपटात रोमान्स आणि कॉमेडी सजलेल्या या चित्रपटाचा रिमेक याच नावाने प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. टी-सीरीज आणि बीआर स्टुडिओ अंतर्गत निर्मित हा चित्रपट मुदस्सर अजीज दिग्दर्शित करत आहेत.