चंकी पांडेची लेक ‘अनन्या’नं उत्साहाच्या भरात शेअर केला स्वत:चाच ‘तो’ व्हिडीओ, नेटीझन्सनं केलं ट्रोल (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे सध्या आपल्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. आपला आगामी सिनेमा पती पत्नी और वो च्या प्रमोशनसाठी तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, ती जेवण करत आहे आणि यावेळीच तिचा ड्रेस डिझायनर तिचा फाटलेला ड्रेस शिवत आहे. अनन्यानं गोल्डन कलरचा ड्रेस घातला आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. सध्या अनन्याचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

अनन्याचा हा लुक चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनन्या सुंदर जरी दिसत असली तरी या व्हिडीओमुळे काही नेटीझन्सनं तिच्यावर निशाणा साधला आहे. अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. अनन्यानं स्वत:च हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे.

सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर हा सिनेमा 1978 साली आलेल्या पती पत्नी और वो या सिनेमाचा रिमेक आहे. त्यावेळी आलेल्या सिनेमात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजिता कौर यांनी काम केलं आहे. 70 दशकातील हा सिनेमा चांगलाच चालला होता. याच सिनेमाचा रिमेक येणार आहे.

पती पत्नी और वो च्या रिमेक सिनेमात पतीची म्हणजेच चिंटू त्यागीची भूमिका अभिनेता कार्तिक आर्यन साकारणार आहे. हा सिनेमा 6 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

life is so much better in neon ✨

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like