अनन्या पांडेनं शेअर केले ‘बाथरोब’मधील लेटेस्ट फोटो ! अर्जुन कपूरनं केलं ‘ट्रोल’

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार अनन्या पांडेनं नुकतेच तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत ज्यावरून अर्जुन कपूरनं तिची पुन्हा एकदा मजा घेतली आहे. अनन्या पांडे ही शौकीन सोशल मीडिया युजर आहे. ती चाहत्यांना आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत लाईफमधील अपडेट्स सांगत असते.

अलीकडेच अनन्यां फेस टाईमवरून काही फ्रेंड्ससोबत संवाद साधला, त्यांच्यासोबत व्हिडीओ कॉलवर गप्पा मारल्या. यातील काही फोटो तिनं तिच्या इंस्टावरून शेअर केले आहेत. यामुळं चाहत्यांना आता तिला बिना मेकअप पाहण्याची संधी मिळाली आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शन दिलं आहे. अनन्या म्हणते, फेसटाईम फोटो फन. द न्यू नॉर्मल विथ @sashajairam.”

अर्जुन कपूर नेहमीच कोणाची ना कोणाची मजा घेत असतो.जसा अनन्यानं हा फोटो शेअर केला अर्जुननं कमेंट केली की, हे एक फोटोशुट आहे. सध्या तिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एका सिनेमात अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. या सिनेमाचं नाव फायटर आहे. याशिवाय अनन्या ईशान खट्टर सोबत खाली पीली या सिनेमात काम करताना दिसणार आहे. मकबूल खान दिग्दर्शित हा सिनेमा 12 जून 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. इतकेच नाही तर ती शकुन बत्राच्या एका सिनेमातही दिसणार आहे. यात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिकेत आहेत.