अनन्या पांडेनं शेअर केले लहानपणीचे जुने फोटो, सुहाना खान तर ओळखूही येत नाही

पोलीसनामा ऑनलाईन टीम : नुकताच आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा झाला. सामान्यांपासून तर सेलिब्रिटीपर्यंत साऱ्यांनीच हा दिवस साजरा केला आणि सोशलवर पोस्ट शेअर केल्या. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेनही हा दिवस आपल्या आयुष्यातील खास महिलांना डेडिकेट केला. कोण काय बोलेल याची तमा न बाळगता अनन्यानं लहानपणीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनन्या खूपच क्युट दिसत आहे. खास बात अशी की, या फोटोत अनन्याची बेस्ट फ्रेंड शनाया कपूर आणि सुहाना खान देखील दिसत आहेत.

अनन्यानं हा फोटो शेअर करत लिहीलं की, “माझ्या आयुष्यातील त्या महिला ज्यांच्या असण्यानं माझ्या स्मरणात राहतं की, मला साहसी, उदार आणि दयाळू रहायचं आहे. हॅप्पी विमेन्स डे सर्व शानदार महिलांसाठी.”

या फोटोंमध्ये सुहाना खान आहे. जी पहिल्यांदा पाहिल्यानंतर ओळखूही येत नाही. तिला ओळखणंही खूप अवघड दिसत आहे. या फोटोंमध्ये अनन्या, शनाया कपूर यांच्या व्यतिरीक्त या तीन बेस्ट फ्रेंडच्या मम्मी देखील दिसत आहेत.”

विजय देवरकोंडासोबत अनन्या करतये पहिल्यांदाच काम
अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडासोबत आपल्या एका सिनेमाला घेऊन सध्या ती चर्चेत आहे. अलीकडेच विजय आणि अनन्या रात्री उशीरा बाईकवर फिरताना स्पॉट झाले होते. या सिनेमाचं नाव फायटर आहे. दोघंही या सिनेमाबद्दल खूप एक्सायटेड आहेत. याशिवाय अनन्या ईशान खट्टर सोबत खाली पीली या सिनेमात काम करताना दिसणार आहे. मकबूल खान दिग्दर्शित हा सिनेमा 12 जून 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.