‘खाली-पीली’साठी अनन्यानं केलं सलग 23 तास शुटींग, सांगितला अनुभव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अनन्या पांडेनं खूपच कमी वयात आपली वेगळी ओळख तयार केली आहे. अनन्याचे चाहते तिच्या आगामी सिनेमाची आतुरतेनं वाट पहात आहेत. सध्या अनन्या आपलाा आगामी सिनेमा खाली पीलीची शुटींग करत आहे. या सिनेमात तिच्या सोबत ईशान खट्टर दिसणार आहे.

अनन्यानं नुकतीच खाली पीली साठी सलग 23 तास शुटींग केलं आहे. अनन्या सध्या शुट आणि इतर प्रोजेक्टमध्ये गुंतली आहे. खाली पीली या सिनेमासाठी तिनं सकाळी 8 वाजता शुटींग सुरू केलं होतं जे दुसऱ्या दिवशी 8 वाजता संपलं. तिनं सिनेमासाठी सलग 23 तास शुटींग केलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनन्याचं शेड्युल खूप बिजी आहे. असं असूनही याचा तिच्या कोणत्याही प्रोजेक्टवर परिणाम होत नाही. ती गाण्याच्या सिक्वेंसची शुटींग करत आहे. कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहे. 2020 च्या येणाऱ्या सिनेमांची स्क्रिप्ट वाचण्यात व्यस्त आहे. त्यापैकी काही सिनेमाची शुटींग ती फेब्रुवारीच्या शेवटी करण्याची शक्यता आहे.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या अनन्या पांडे खाली पीली या सिनेमच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अनन्या ईशान खट्टर सोबत काम करताना दिसणार आहे. सिनेमाचा एक लुकही काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला आहे.