रात्री उशीरापर्यंत दाक्षिणात्य स्टारसोबत दिसली अनन्या पांडे, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अनन्या पांडे आणि साऊथ स्टार विजय देवरकोंडा दोघे एकत्र बाईक रायडींग करताना स्पॉट झाले आहेत. यावेळी अनन्या विजयकडे तोंड करून बाईकच्या टाकीवर बसलेली दिसली. सध्या अनन्याच्या लेट नाईट बाईक राईडचे हे फोटो सोशलवर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहेत. विजय देवरकोंडाचा अर्जुन रेड्डी सिनेमा खूप गाजला आहे.

अनन्यानंही तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच्या हातात स्क्रिप्टही दिसत आहे. तिच्या सोबत विजय देवरकोंडाही दिसत आहे. तिनं फोटो शेअर करताना म्हणते, “मी सेटवर नेहमीच हसत असते.” या फोटोवरून लक्षात येत आहे की, विजय आणि अनन्या एका प्रोजेक्टमध्ये काम करत आहेत.

विजय आणि अनन्याच्या या फोटोंव्यतिरीक्त इतरही काही फोटो आहेत जे व्हायरल होत आहेत ज्यात ती विजय सोबत लेट नाईट बाईक राईड करत आहे. विजयसोबतचे फोटो सध्या चर्चेत आहेत. या फोटोवरून नेटकरी अनेक वेगवेगळे अंदाज लावताना दिसत आहे. अनन्यानं फोटोला दिलेल्या तिच्या कॅप्शनवरून असं दिसत आहे की, लवकरच ती आपला तेलगू डेब्यू करत आहे. विजय देवरकोंडासोबत अनन्या पहिल्यांदाच काम करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B9Jf4TJHjHC/

https://www.instagram.com/p/B9JZ-sYhPeq/