अभिनेत्री अनन्या पांडेला ‘या’ अभिनेत्यासोबत करायचाय एकदम ‘हॉट’ सीन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेने नुकताच एक खुलासा केला आहे. तिला हॉटसीन करण्याची संधी मिळाली तर कोणत्या अभिनेत्यासोबत करायला आवडेल हे तिने सांगितले आहे. तसं तर तिचं क्रश असलेल्या अभिनेत्याबद्दल ती नेहमीच बोलत असते. आता तिने बिनधास्तपणे त्याचे नाव घेतले आहे. याआधी मात्र तिने एका मुलाखतीत कार्तिक आर्यनवर क्रश असल्याचं सांगितलं होतं.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनन्याला हॉट सीन म्हणजेच प्रणयदृश्य करायचे असेल तर कोणासोबत करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला. अनन्या म्हणते की, “कार्तिक आर्यन माझा क्रश आहे. हे मी आधीही सांगितले आहे. परंतु यासोबतच माझे आणखीही क्रश आहेत. मला वरुण धवनसोबत हॉट सीन करायला आवडेल” असे अनन्या म्हटली आहे.

पुढे तिला विचारण्यात आले की, कार्तिक आर्यन आणि ईशान खट्टर या दोन अभिनेत्यांपैकी कोणासोबत डेटवर जायला आवडेल ? यावर अनन्या म्हणाली की, “मला कार्तिकसोबत डेटवर जायला जास्त आवडेल.”

निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर 2 या सिनेमातून अनन्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. यानंतर ती आता ‘पती पत्नी और वो’ या सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात भूमी पेडणेकरही दिसणार आहे.