सुहाना खानच्या ‘या’ टॉपवर आलं अनन्या पांडेचं ‘मन’ ! म्हणाली-‘उसना देणार का ?’, सुहानानं दिलं मजेदार उत्तर

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि गौरी खान यांची लाडकी सुहाना खान आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्यातील मैत्री साऱ्यांनाच माहिती आहे. अलीकडेच सुहनानं अनन्याचे काही शुटमधील फोटो एडिट केले होते ज्यामुळं दोघी चर्चेत आल्या होत्या. यानंतर आता पुन्हा एक पोस्ट समोर आली आहे.

अलीकडेच गौरी खाननं लाडक्या सुहानाचे काही होम फोटोशुटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. लुकबद्दल बोलायचं झालं तर सुहानानं स्ट्रेपलेस टॉप आणि जिन्स घातली होती. यात सुहाना खूप सुंदर दिसत होती. फोटो शेअर करताना गौरीनं लिहिलं होतं की, “ना ही हेअर स्टाईल केलीय. ना ही मेकअप. फक्त फोटोग्राफी.”

गौरीनं शेअर केलेले फोटो क्षणातच व्हायरल झाले. यावर सर्वांनीच लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला. या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे अनन्या पांडेच्या कमेंटनं. अनन्या पांडेनं कमेंट केली की, “हा टॉप मला खूप आवडला सु. परंतु तू मला कधी हा उसना देणार नाहीस.” यावर सुहानानं तिला उत्तर दिलं आधी शॉर्ट परत दे. यावर अनन्या म्हणते, सध्या मी घातली आहे शॉर्ट आणि रोज नेहमीच घालणार आहे.

https://www.instagram.com/p/CALQpbtJkZs/

सुहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा(लुघपट) द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचे लेखक-दिग्दर्शक थियोडोर जिमेनो(Theodore Gimeno) आहेत. या सिनेमात सुहानासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याचे नाव ऑस्कर आहे.

https://www.instagram.com/p/B-i39lNp8Gn/

https://www.instagram.com/p/B-6S9V-p5Aj/

https://www.instagram.com/p/B-Y9RS5Jgjn/

https://www.instagram.com/p/B9uJKqbpxi-/

https://www.instagram.com/p/B9nobTRpbcO/

https://www.instagram.com/p/B9IvRYZplXL/

https://www.instagram.com/p/B8-qpa2JXIo/

https://www.instagram.com/p/B649LGGp3Qv/