अनन्या पांडेची बहिण अलानानं शेअर केला तंबूमधील बॉयफ्रेंडसोबतचा ‘रोमँटीक’ फोटो !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची पुतणी आणि अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे नेहमीच चर्चेत असते. याचे कारण म्हणजे अलाना पांडेचे सोशल मीडियावरील फोटो. बॉलिवूडमध्ये येण्याआधीच अलाना स्टार झाली आहे. सोशलवर अलानाची मोठी फॅन फॉलोविंग आहे. आपल्या बिकीनी फोटोंमुळे अलाना पुन्हा चर्चेत आली आहे. ज्यात अलाना कमालीची हॉट आणि बोल्ड दिसत होती. आता अलानानं चक्क बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटीक फोटो सोशलवर शेअर केला आहे जो सध्या चर्चेत आहे.

https://www.instagram.com/p/CBLa6uqBCCF/

अलानानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिचा बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटीक मूड दिसत आहे. फोटोत दिसत आहे की दोघेही एक तंबूमध्ये झोपलेले आहेत. रिपोर्टनुसार तिच्या बॉयफ्रेंडचं नाव युडी जयसिंह आहे. हा फोटो जास्त रोमँटीक यामुळं वाटत आहे की, यात त्या दोघांची फक्त पाय दिसत आहे ज्यावर कोणतेही कपडे नाहीत. फोटो पाहून चाहत्यांना असाही प्रश्न पडला आहे की, दोघं क्लोथलेस तर नाहीत. काहींनी तर तशी कमेंटही केली आहे. याआधीही तिनं बॉयफ्रेंडसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत.

अलानाचे फोटो व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिनं बिकिनी लुकनं सोशलवर राडा घातला आहे. अशीही चर्चा आहे की, लवकरच अलाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते.

https://www.instagram.com/p/CAwtnw_ht0x/

अलानाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर डिझायनर मोनीषा जयसिंह यांचा मुलगा युडी जयसिंहसोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे. हॉलिडे असो वा पार्टी दोघे नेहमीच एकत्र दिसत असतात. युडी अलानाच्या कजिन सिस्टरच्या बॉयफ्रेंडचाच भाऊ आहे. अनन्या चंकी पांडेची मुलगी आणि अलानाची कझिन सिस्टर आहे जी मोनिषा जयसिंहचा मुलगा आणि युडीचा भाऊ करण जयसिंहसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

https://www.instagram.com/p/B_z4okLncm8/

https://www.instagram.com/p/B-gXVZLBi4Z/