एकदम अनाडी दिसते, पत्नी हेमा मालिनीला धर्मेंद्र यांनीही केलं ‘ट्रोल’ (Video)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या अभियानांतर्गत गेल्या आठावड्यात संसदेबाहेरच्या रस्त्याची सर्व खासदारांनी मिळून सफाई केली. त्यात सफाई करताना खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही झाडू हाती घेतला होता. मात्र झाडू मारतानाचा व्हायरल झालेल्या व्हीडिओमधून हेमा मालिनी या सोशल मीडियावर ट्रोल झाल्या. कारण त्यांना झाडूही व्यवस्थित मारता येत नव्हता. त्यामुळे त्या ट्रोल झाल्या. इतर नागरिकांनी ट्रोल केले त्यात नवलं नव्हते. मात्र आता तर हेमा मालिनी यांचे पती आणि बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनीच त्यांची ‘अनाडी दिसत आहे’ म्हणत खिल्ली उडवली आहे.

व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये हेमा मालिनी आणि अनुराग ठाकूर झाडू मारताना दिसत आहेत. त्यात हेमा मालिनी यांचा झाडू जमिनीलाही लात नाहीये. त्यामुळे हेमा मालिनी हवेत झाडू मारत आहेत का, असं म्हणत त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर धर्मेंद्र यांच्या ट्वीटरवरही लोकांनी त्यांना प्रश्न केले. सर मॅडमनी प्रत्यक्षात कधी हातात झाडू घेतला आहे का?, असा प्रश्न एका ट्वीटर हँडलरने विचारला. त्यावर धर्मेंद्र यांनीही मग हेमा मालिनी यांची खिल्ली उडवली.

धर्मेंद्र यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही तसंच उत्तर दिलं. ‘हा चित्रपटात मला पण ती अनाडी वाटली, असं म्हणत त्यांनी हेमा मालिनी यांची खिल्ली उडवली. तसंच मी आईची लहानपणी खूप मदत केली आहे. मी झाडू मारण्यात पटाईत होतो. मला स्वच्छतेची आवड आहे’ असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, झाडू मारल्यानंतर हेमा मालिनी यांनी सांगितले होते की, महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त संसद परिसरात स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. पुढच्या आठवड्यात मथुरा येथे जाऊन मी पुन्हा हे अभियान राबवेन. मात्र तेथील त्यांच्या झाडू मारण्यावरही सर्वांचे लक्ष असेल हे नक्की.

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी