…आणि गुरुनाथ सुभेदार थोडक्यात बचावला 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा नायक गुरुनाथ सुभेदार म्हणजे अभिनेता अभिजित खांडकेकर यांच्या गाडीचा रविवारी २५ नोव्हेंबर रोजी अपघात झाला आहे. या अपघातात गुरु थोडक्यात बचावला आहे. त्याला कसलीच दुखापत झाली नाही परंतु त्याची गाडी तीव्र स्वरूपात फुटली आहे. रविवारी शूटिंगला जाताना गुरूच्या गाडी समोरील ट्र्क मधील मोठा लोखंडी पाईप गरंगळत येऊन गुरूच्या गाडीच्या काचेवर येऊन आदळला आणि गुरुच्या गाडीची काच पूर्णपणे फुटली. या अपघातात गुरूच्या कानावरून वेळ गेली आहे.

अभिजित खांडकेकर यांनी साकारलेली गुरुनाथ सुभेदार भूमिका रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे. गुरुनाथ सुभेदार आणि राधिका सुभेदार हे पती पत्नी आणि  शनया नावाची गुरुची गर्लफ्रेंड या तिघांच्या भोवती हि मालिका फिरते या मालिकेत राधिकाची भूमिका घराघरातील  महिलांना खूप प्रेरणादायी वाटते कारण राधिकाने ‘राधिका मसाले’ हि  कंपनी मोठ्या हिंमतीने उभा केली आणि त्यातून कोट्यवधींची कमाई करून आपला नवरा आणि त्याची गर्लफ्रेंड ज्या कंपनीत काम करत असतात ती कंपनी राधिकाने खरेदी केली.

त्यानंतर मालिकेत विशिष्ठ मोड आला गुरुनाथची भूमिका नायकातून खलनायकात बदलत गेली त्यामुळे त्याची भूमिका बघून घरोघर बायका त्याच्या नावाने बोटे मोडू लागल्या एवढी सरस भूमिका करणारा नायक अभिजित खांडकेकर आहे. त्याच्या अपघाताचे वृत्त आज तीन दिवसांनी समोर आले आहे. कारण या विषयी त्याने माध्यमात वाच्यता केली नव्हती.

अपघातात गुरूच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे त्या फुटलेल्या गाडीचा फोटो  गुरूने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर टाकला आहे. गुरुने हा फोटो पोस्ट केल्या नंतरच  या घटनेची सत्यता सर्वाना समजली आहे. याच बरोबर अभिजीतच्या गाडीला झालेल्या अपघाता संदर्भात कसल्याही अफवा उठू नये म्हणून त्याने स्वतः इंस्टाग्राम वर आपण सुखरूप असल्याची स्पष्टोक्ती दिली आहे.  अभिजीतच्या गाडीचा अपघात झाल्याचे समजतात त्याच्या चाहत्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.