अन् ऐतिहासिक नानावाड्यामध्ये क्रांतीलढा जागृत झाला

क्रांतीकारकांच्या संग्रहालयाचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन - मुक्ता टिळक, महापौर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऐतिहासिक क्रांती लढ्याची माहिती भावी पिढीला व्हावी आणि पर्यटनालाही चालना मिळावी यासाठी बुधवार पेठेतील ऐतिहासिक नाना वाड्यामध्ये क्रांतीकारकांची माहिती दृकश्राव्य माहिती देणारे आकर्षक संग्रहालय उभारण्यात आले आहे.

महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या या संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या रविवारी दि. २३ जून रोजी होणार आहे. या संग्रहालयाचा पुणे दर्शन उपक्रमामध्ये समावेश करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी आज नाना वाडयामध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.

मुक्ता टिळक यांनी सांगितले, की पेशव्यांचे विश्‍वासू मंत्री नाना फडणवीस यांनी १७४० ते १७५० दरम्यान शनिवार वाड्याच्या मागील बाजूस नानावाडा बांधला. यानंतर दीडशे वर्षांनी या वाड्याचे विस्तारीकरण करण्यात आले. दगड आणि लाकडाचा वापर करून बांधण्यात आलेल्या या चौसोपी आणि तीन मजली वाड्यामध्ये मागील काही काळात शाळा आणि नंतर महापालिकेचे कार्यालय सुरू करण्यात आले होते.

परंतू ऐतिहासिक वास्तूंमध्ये ए ग्रेड असलेल्या या वाड्यामध्ये क्रांतीकारकांचे संग्रहालय करण्याबाबत पालिकेने २०१० मध्ये निर्णय घेतला. त्यानुसार नानावाड्याच्या दुरूस्तीचे आणि रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आले. आजमितीला पुर्वीप्रमाणेच त्याचे रुपडे पालटले आहे.

तळमजल्यावरील ११ खोल्यांमध्ये पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाबाई यांनी पुण्याची रोवलेली मुहुर्तमेढ, आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक, क्रांतीवीर वासुदेव बळवंत ङ्गडके, क्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे, १८५७ चे बंड, आदिवासींचा उठाव, नेमस्तांची चळवळ, बाळ गंगाधर टिळक, चाङ्गेकर बंधू यांच्या जीवन चरित्रावर आधारीत म्युरल्स, ध्वनी आणि चित्रङ्गितींचे आयोजन करण्यात आले आहे.

या सर्वकामासाठी आतापर्यंत पाच कोटी रुपये खर्च आला आहे. पुढील दोन टप्प्यात पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावर स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीकारांचे जीवनपट दाखविणारी अशीच म्युरल्स आणि लाईट ऍन्ड साउंड शोही सुरू करण्यात येणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यलढा आणि क्रांतीकारकांची माहिती व्हावी यासाठी हे संग्रहालय मोठे आकर्षण ठरणार आहे.

यामुळे ऐतिहासिक पुण्यातील पर्यटनवृद्धीसाठीही याचा उपयोग होईल, असे टिळक यांनी नमुद केले. स्थानीक नगरसेवक हेमंत रासने, रागिणी खडके, महापालिकेच्या भवन विभागाचे अभियंता शिवाजी लंके, वर्षा जाधव उपस्थित होते.

आरोग्य विषयक वृत्त – 

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा “पायलेट्स एक्सरसाइज”

भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

२१ जून जागतिक योग दिन : ” हे ” आहेत भारतातील सर्वात मोठे योगगुरू