…अन् राहुल गांधी यांनी संगमनेरातच मुक्काम ठोकला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा शुक्रवारी रात्री दहा वाजता संपल्यानंतर त्यांनी संगमनेर येथेच मुक्कामाचा निर्णय घेतला. संगमनेर येथील महाविद्यालयाच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी रात्र घालविली. त्यामुळे सुरक्षारक्षकांना रात्रभर जागे राहून खडा पहारा द्यावा लागला.

काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा होती. विमानात बिघाड झाल्याने त्यांना पोहोचण्यास रात्रीचे साडेनऊ वाजले. दहा वाजता सभा संपल्यानंतर उशीर झाल्याचे कारण देत गांधी यांनी संगमनेरमध्येच मुक्कामाचा निर्णय घेतला.

महाविद्यालयाच्या साध्या गेस्ट हाउसमध्ये राहणार होते. सोबत कपडे नव्हते. त्यामुळे घाईघाईत दुकानात जाऊन शॉर्ट पॅन्ट, टी-शर्ट घेऊन कार्यकर्ते आले. त्यांच्या अंगावरील ड्रेस रात्रीच धुतला. सकाळी व्यवस्थित इस्त्री करून तो गांधी यांच्याकडे देण्यात आला. गांधी आणि तोच ड्रेस परिधान केला. त्यानंतर शिर्डी विमानतळाच्या दिशेने निघाले.रात्री मुक्कामात राहुल गांधी यांनी साधे जेवण घेतले. महाराष्ट्रीयन पद्धतीचे पिठले भाकरी खाल्ली. सकाळी नाष्टा करून ते गेले.