अन् शबाना आजमी यांना भारतीय रेल्वेची मागावी लागली माफी

मुंबई : वृत्तसंस्था

सोशल नेटवर्कींग वर व्हायरल होणाऱ्या पोस्ट कुठल्या आणि किती खऱ्या – खोट्या असतात हे सर्वपरिचित आहे. आता जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना एका व्हिडीओ बाबत झालेल्या गैरसमजामुळे चक्क भारतीय रेल्वेची माफी मागावी लागल्याची घटना आहे. यासंदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, शबाना यांनी ट्विटर ला एक व्हिडीओ पोस्ट केला होता . या व्हिडिओतील कर्मचारी घाणेरड्या पाण्यात प्लेट्स धुत होते. हे कर्मचारी भारतीय रेल्वेचे आहेत असा समज करून घेत शबाना आजमी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनाही टॅग केले होते . शबाना आजमी यांनी पोस्ट केलेल्या ३० सेकंदाच्या व्हिडीओत काही कर्मचारी खड्ड्यात साचलेल्या घाणेरड्या पाण्यात प्लेट्स धुताना दिसत होते. सोमवारी सकाळी शबाना आजमी यांनी व्हिडीओ पोस्ट करत पियूष गोयल यांना पाहण्याचे आवाहन केले होते. संध्याकाळी रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण देत त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली.

यानंतर , मॅडम हा व्हिडीओ मलेशिअन रेस्टॉरंटमधील असल्याचं रेल्वे मंत्रालायने ट्विटरला रिप्लाय देत सांगितलं. यावेळी त्यांनी एक बातमीची लिंकही सोबत दिली. यानंतर लगेचच आपली चूक लक्षात येताच शबाना आजमी यांनी माफी मागितली. पण तोपर्यंत ट्विटरकरांना आयती संधी मिळाली होती. त्यांनी शबाना आजमी यांना ट्रोल करत रेल्वेला त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यास सांगितले. यानंतर शबाना आजमी यांनी आपण पुन्हा एकदा आपण बिनशर्त माफी मागितले असल्याचे सांगितले .