….आणि मैदानात झळकले ‘हे’ बॅनर, ख्राईसचर्चवरील बॅनरने अनेकांना आली आठवण ‘या’ माजी कर्णधाराची

ख्राईसचर्च : वृत्तसंस्था – पहिल्या कसोटीपाठोपाठ न्यूझिलंडने दुसर्‍या कसोटीतील भारताचा दारुण पराभव करीत व्हाईट वॉश दिला. खेळात हार जीत होत असते. पण इतका दारुण पराभव कधीही कोणत्याही रसिकांना मान्य नसतो. क्रिकेटरसिकांना तर ते कधीच मान्य होत नाही. दुसर्‍या कसोटीत जेव्हा भारत पराभवाच्या काठावर होता. तेव्हा मैदानात एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या बॅनरवर ‘मिस यु धोनी’ असे लिहिले होते.

एम एस धोनी याने अजून आपली संपूर्ण निवृत्ती जाहीर केलेली नाही. न्यूझिलंडमध्ये एक दिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटीमध्ये टीम इंडियाने निराशजनक कामगिरी केली. त्यामुळे भारताच्या दुसर्‍या डावात ९ बाद ११४ धावा झाल्या असताना एका भारतीय जोडप्यातील तरुणाने एक बॅनर फडकविले. त्यावर ‘मिस यु धोनी’ असे लिहिले होते. तर तरुणीच्या हातात धोनीचे फोटो होता. हा सामना पाहताना अनेकांना आता धोनी हवा होता, अशी जाणीव होऊन गेली.