Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या (Andheri by-Election) जागेसाठी येत्या 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गट आणि भाजपच्या  (BJP) उमेदवारामध्ये लढत होणार आहे. निवडणुकीत ठाकरे गटाचे दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली असून भाजपने मुराजी पटेल (BJP Muraji Patel) यांना लटके यांच्या विरोधात उभे केले आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. मात्र, ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला असला, तरी शिवसेना ठाकरे गट सावध पावले टाकत आहे. कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत ही पोटनिवडणूक (Andheri by-Election) जिंकायची आहे.

ऋतुजा लटके यांचा अर्ज जर कोणत्याही कारणाने अवैध ठरला, तर ठाकरे यांनी प्लॅन बी देखील तयार ठेवला आहे. खबरदारी म्हणून संदीप राजू नाईक (Sandeep Raju Naik) यांचा देखील डमी उमेदवारी अर्ज ठाकरे यांच्यातर्फे दाखल करण्यात आला आहे.

संदीप नाईक हे युवासेनेचे पदाधिकारी आहेत. तसेच ते अंधेरी पूर्वचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचे निकटवर्तीय देखील आहेत. लटके यांच्यासोबत ते मतदारसंघात सक्रिय होते. त्यांना या मतदारसंघाची इत्थंभूत माहिती आहे.
तसेच नाईक लटके यांच्या कुटुंबाचे विश्वासू म्हणून देखील ओळखले जातात.
यापूर्वी देखील ऋतुजा लटके यांच्या महापालिकेतील नोकरीचा राजीनाम्याचा वाद सुरु होता,
तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडून संदीप नाईक (Sandeep Naik) यांचा विचार झाला होता.

ऋतुजा लटके यांना महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) पाठिंबा आहे.
पण त्यांचा अर्ज बाद झाला, तर नामुष्की रोखण्यासाठी ठाकरेंनी अगोदरच रूपरेषा आखून ठेवली आहे.
अंधेरीतील ही निवडणूक (Andheri by-Election) ठाकरे आणि भाजपच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे.
त्यामुळे या निवडणुकीवर मुंबईसह राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title :- Andheri by-Election | maharashtra political crisis mumbai andheri east vidhansabha bypoll shivsena uddhav thackeray back up plan rutuja latke sandeep naik candidature

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Girish Mahajan | उद्धव ठाकरे यांना गिरीश महाजनांचा टोला, म्हणाले – भुजबळ बाळासाहेबांबद्दल काय काय बोलत होते…

Vinayak Raut | खोके घेतले नाहीत म्हणून चौकशी, विनायक राऊतांचा गंभीर आरोप

Uday Samant | उदय सामंत यांचा थेट इशारा, म्हणाले – ‘ज्यावेळी भाजप आमचा वापर करतंय असं वाटेल, तेव्हा आम्ही…’