Andheri by-Election | अंधेरी पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र, म्हणाले-‘प्रिय मित्र देवेंद्र… एक विशेष विनंती… ‘

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri by-Election) ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना ठाकरे सेना-काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी (NCP) महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजप (BJP)-शिंदे गट (Shinde Group)- रिपाइंने मुरजी पटेल (Murji Patel) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri by-Election) मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून आवाहन केले आहे.

 

राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले…

प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र!
एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणास लिहितो आहे.
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या (Andheri by-Election) जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरु झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षाने ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल.

 

 

Web Title :- Andheri By-Election | Raj Thackeray’s letter to Fadnavis regarding Andheri by-elections, said – ‘Dear friend Devendra… a special request…’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

T20 World Cup 2022 | स्पर्धेत पाऊस पडल्यास किंवा सामना टाय झाल्यास… जाणून घ्या ICC चे नियम

MNS Sandeep Deshpande | मनसेचा शिवसेनेवर प्रश्नांचा भडीमार, सहानुभूतीवर मतं मागू नका, कामांच्या मुद्द्यावर मागा

Ambadas Danve | अंबादास दानवेंचा भाजपला इशारा, म्हणाले-‘हीच शिवसेना आणि मशाल तुम्हाला…’