Andheri Bypoll Result | भाजपच्या मदतीने ऋतुजा लटके विजयी, अन्यथा…, ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर भाजपची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी (Andheri Bypoll Result) पूर्ण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या (Thackeray Group) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) या अपेक्षेप्रमाणे विजयी झाल्या असून दुसऱ्या क्रमांकावर ‘नोटा’ (Nota) पर्यायाला मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरुन शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांकडून भाजपवर (BJP) आरोप केले जात आहेत. शिवसेना नेत्यांच्या आरोपांना भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने ऋतुजा लटके यांचे अभिनंदन करुन त्यांचा विजय भाजपमुळे झाल्याचे म्हटले आहे. तसेच आम्ही निवडणूक लढवली असती तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचा पराभव निश्चित असता असे आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी म्हटले.

अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके याचा 53471 मतांनी विजय झाला आहे. या पोटनिवडणुकीत दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा केला होता. परंतु ऐनवेळी भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले की, भाजपच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्वमध्ये
विजय झाला. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP), भाकप व इतर डझनभर
पक्षांनी पाठिंबा देऊनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अधिक मतदान झालेच नसल्याचे सांगत भाजपने
निवडणूक लढवली असती तर त्यांचा पराभव निश्चित होता असे शेलार यांनी म्हटले.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मते मिळाली. तर नोटा या पर्यायाला 12 हजार 776
मते मिळाली. अपक्ष उमेदवार बाळा नाडर (Baby Nader) यांना 1506 मते मिळाली.
2019 च्या निडणुकीत 1 लाख 47 हजार 117 मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके (Ramesh Latke)
यांना 62 हजार 773 मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांना 45 हजार 808 मते मिळाली होती.

Web Title :-  Andheri Bypoll Result | andheri bypoll result bjp mumbai president ashish shelar reaction andheri bypoll result 2022 due to bjp shivsena thackeray faction won

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

T20 World Cup 2022 | सुपर संडे ठरला गेम चेंजर! पाकिस्तानची सेमीफायनलमध्ये धडक

Andheri Bypoll Result | उद्धव ठाकरे गटाने अंधेरीचा ‘गड’ राखला, प्रतिक्रिया देताना ऋतुजा लटके पतीच्या आठवणीने झाल्या भावुक