Andheri Bypoll Result | उद्धव ठाकरे गटाने अंधेरीचा ‘गड’ राखला, प्रतिक्रिया देताना ऋतुजा लटके पतीच्या आठवणीने झाल्या भावुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये (Andheri Bypoll Result) शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray Group) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत लटके या आघाडीवर होत्या. लटके 53,471 मतांनी विजयी झाल्या आहेत. दरम्यान (Andheri Bypoll Result) हा माझा विजय नसून माझे पती रमेश लटके (Ramesh Latke) यांचा विजय आहे. त्यांनी केलेल्या कामाची परफेड जनतेने केली असल्याची प्रतिक्रिया देताना ऋतुजा लटके भावुक झाल्या.

हा विजय माझा नाही तर माझ्या पतीचा आहे. मतदारांनी माझ्या पतीने जे काम केले त्यालाच लोकांनी आज प्रतिसाद दिला. या विजयाचा मी जल्लोष करणार नाही, मला खंत आहे की, पतीच्या निधनानंतर निवडणूक लढवली, असं म्हणत ऋतुजा लटके यांनी सर्वांचे आभार मानले.

त्यांनी उमेदवारी जरी मागे घेतली तरीही त्यांनी नोटा (NOTA) साठी मतदान (Andheri Bypoll Result) करण्यासाठी प्रचार केला होता. त्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आले होते. पण मतदारांनी या सगळ्या गोष्टींना नाकारलं आणि शिवसेनेला मतदान केलं. जे नोटाचे वोटिंग झाले आहे ते भाजपचेच (BJP) आहेत. त्यामुळे त्यांना तेवढीच मत मिळातील असे वाटत होते म्हणून त्यांनी माघार घेतली. त्यांना सहानुभूती असती तर त्यांनी आधीच उमेदवार दिला नसता, अशी टीका ऋतुजा लटके यांनी केली.

लटके पुढे म्हणाल्या, रमेश लटके यांनी जी काही काम हाती घेतली होती, ती राहिली होती ती पूर्ण करणार आहे.
अंधेरीचा विकास हेच माझं ध्येय आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आशीर्वाद आणि आदित्य ठाकरे
(Aaditya Thackeray), अनिल परब (Anil Parab) यांची साथ यामुळे मी जिंकले आहे.
आता मातोश्रीवर जाणार असल्याचे लटके यांनी सांगितले.

Web Title :-   Andheri Bypoll Result | rutuja latkes first reaction was emotional with the memory of her husband

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Andheri Bypoll Result | अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंना ‘नोटा’ची टक्कर, अंबादास दानवेंचा भाजपवर गंभीर आरोप

T20 World Cup | नेदरलँडच्या विजयावर मराठमोळे अभिनेते ऋषिकेश जोशींनी केली हि भन्नाट पोस्ट, सोशल मीडियावर होत आहे व्हायरल