Andheri Bypoll Result | ‘नोटा’ वरुन ठाकरे गटाची भाजपवर टीका, शिंदे गटाच्या मंत्र्याने दिले प्रत्युत्तर, म्हणाले-‘…तर वेगळे निकाल दिसले असते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll Result) ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) या विजयी झाल्या आहेत. तर दोन नंबरची मतं ‘नोटा’ला (NOTA) मिळाली आहेत. यावरून ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अंधेरी पोट निवडणुकीत (Andheri Bypoll Result) नोटाला मतं हे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. याबाबत शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना विचारण्यात आले. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते रत्नागिरीत एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

उदय सामंत म्हणाले, आम्हा सर्वांना समाधान आहे की आमचे सहकारी रमेश लटके (Ramesh Latke) हे आज आमच्यात नाहीत. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके फार मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत. त्याबद्दल आम्हाला सर्वांनाच समाधान आहे. लटके यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते नोटाला मिळालीत. याबाबत बोलताना सामंत म्हणाले, मला वाटतं प्रत्येक पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. निवडणुकीचं (Andheri Bypoll Result) मतदान कमी का झालं याचं आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे आणि नोटाला मतं का पडली याचंही आत्मचिंतन केलं पाहिजे.

काही लोकं नोटाला मतं मिळाली याला भाजपला जबाबदार धरत आहेत. हे योग्य आहे असं मला वाटत नाही.
प्रचारात लोक नोटाला मतदान करणार आहेत असं जाणवलं असेल, त्यामुळे हे खापर भाजपवर फोडण्याचा प्रयत्न झाला असावा.
असं षडयंत्र करायचं असतं तर वेगळे निकाल दिसले असते.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जो शब्द दिला तो शब्द सर्व कार्यकर्त्यांनी पाळला आहे, असे उदय सामंत म्हणाले.

 

 

Web Title :- Andheri Bypoll Result | uday samant comment on andheri election result rutuja latake nota votes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा