Andheri East By-Election | भाजपाचे मुरजी पटेल करोडपती तर ऋतुजा लटके लखपती, दोघांच्या शिक्षणातही मोठी तफावत, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri East By-Election) शिवसेनेकडून ऋतुजा लटके (Shivsena Rutuja Latke) यांनी, तर भाजपाकडून मुरजी पटेल (BJP Murji Patel) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्या संपूर्ण राज्याचे या पोटनिवडणुकीकडे (Andheri East By-Election) लक्ष लागले आहे. दोन्ही उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात (Affidavit) त्यांची संपत्ती, शिक्षण इत्यादी माहिती नमूद केली आहे. यावरून स्पष्ट दिसते की, भाजपचे मुरजी पटेल हे कोट्यधीश उमेदवार आहेत तर शिवसेनेच्या लटके या लखपती आहेत. दोघांच्या शिक्षणात देखील मोठी तफावत आहे. पटेल हे अवघे नववी पास आहेत तर ऋतुजा लटके कॉमर्स पदवीधर आहेत.

 

निवडणूक आयोगाला (Election Commission) दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुरजी पटेल यांची एकूण संपत्ती 10 कोटी 41 लाख रुपयांची आहे. यापैकी 5 कोटी 41 लाख रुपये मुरजी पटेल यांच्या नावावर आहे. 5 कोटी रुपयांची संपत्ती आपत्यांच्या नावावर आहे. अंधेरीमध्ये (Andheri East By-Election) मुरजी पटेल यांच्या नावावर 3 फ्लॅट आहेत.

 

मुरजी पटेल यांच्याकडे गुजरातमधील (Gujarat) कच्छ येथे 30 एकर जमीन आहे.
तर त्यांच्या पत्नीच्या नावावर कच्छ येथे 30 एकर जमीन आहे.
या जमीनी 2013-14 मध्ये 98 लाख रुपयांमध्ये खरेदी केल्या आहेत.
याची सध्याची किंमत 4 कोटी 25 लाख रुपये इतकी आहे. मुरजी पटेल यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे.
मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 2 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

तर शिवसेना उमेदवार ऋतुजा लटके यांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानासुर त्यांच्याकडे 43 लाख 89 हजार 504 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
ऋतुजा लटके यांच्यासह मुलांच्या नावावर 12.35 एकर जमीन आहे. ऋतुजा लटके यांच्यावर 15 लाख 29 हजाराचे गृह कर्ज आहे. ऋतुजा लटके यांच्याकडे 75 हजार रुपयांची रोख रक्कम आहे.
तर त्यांच्या मुलाकडे पाच हजार रुपये आहेत.

 

ऋतुजा लटके यांच्याकडे 51 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
स्थावर मालमत्तेत त्यांच्या नावे चिपळूणमधील एका घराचा उल्लेख आहे.
पती स्वर्गीय रमेश लटकेंची मालमत्ता त्यांच्या नावावर अद्याप झालेली नाही.
ऋतुजा लटके कॉमर्स शाखेच्या पदवीधर आहेत.

 

Web Title :- Andheri East By-Election | andheri east bypoll election murji patel and rutuja latke affidavits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Women Asia Cup 2022 | आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवत टीम इंडियाने केला ‘हा’ पराक्रम

Nilesh Rane | निलेश राणेंची जीभ पुन्हा घसरली, भास्कर जाधवांना म्हणाले बिनकामाचा बैल, जयंत पाटील, अजित पवारांवर केली टीका

Chitra Wagh | कोणी जर मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तर…, चित्रा वाघ यांचा इशारा