Andheri East By-Election | शरद पवारांच्या महत्वाच्या वक्तव्यामुळे अंधेरी पोट निवडणुकीत ट्विस्ट, म्हणाले – अजूनही…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी आज अंधरी पोटनिवडणुकीला (Andheri East By-Election) वेगळे वळण दिले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनीही शिवसेना (Shivsena) उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्यासाठी ही पोटनिवडणूक (Andheri East By-Election) बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. लटके यांच्या विरोधात इतर पक्षांनी उमेदवार देऊ नये, त्यांच्या विरोधातील अर्ज मागे घ्यावा. अजूनही उमेदवार मागे घेण्यासाठी वेळ आहे, असे आवाहन पवार यांनी केले आहे. यामुळे पोटनिवडणुकीत पुढे काय होणार याची उत्कंठा वाढली आहे.

 

शरद पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे अशी माझी इच्छा आहे. दीड वर्षांच्या कालावधीसाठी राजकारण नको. ही निवडणूक प्रतिष्ठेची करु नका. लटके यांच्या राजीनाम्याबाबत पालिकेने योग्य निर्णय घ्यायला हवा होता.

 

शरद पवार यांनी सर्व पक्षांना आवाहन केले की, महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे. अंधेरी पोटनिवडणूक (Andheri East By-Election) प्रक्रिया सुरु झाली आहे. ही निवडूनक ऋतुजा रमेश लटके निवडणूक लढत आहेत. भाजपाकडूनही (BJP) उमेदवार निवडणूक लढत आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध व्हावी. जेव्हा मी एखादा निर्णय घेतो तेव्हा त्या मागे एक विचार असतो. आज रमेश लटके (Ramesh Latke) नाहीत म्हणून ही जागा निर्माण झाली आहे. यामुळे येथे कोणीही उमेदवार देऊ नये.

पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवारामधून जर कोणी निवडणूक लढवणार असेल तर आम्ही उमेदवार उभा करणार नाही अशी भूमिका घेतली होती. यामुळे बिनविरोध निवडणूक घेण्याची परंपरा बंद करु नये.

 

भाजपाला आवाहन करताना पवार म्हणाले, हा उमेदवार फक्त एक वर्ष राहणार आहे.
त्यामुळे अशा प्रकारे जर निवडणूक टाळता आली तर बरे होईल. असे वाटते की एका वर्षासाठी निवडणूक नको.
कोल्हापूर आणि पंढरपूर वेळी कालावधी मोठा होता. आता कमी आहे. म्हणून निवडणूक नको.
अजून अर्ज मागे घेण्यासाठी मुदत बाकी आहे.

 

Web Title :- Andheri East By-Election | sharad pawar urged that andheri pot election should be uncontested