अंधेरी अग्नितांडव : मुख्य अभियंत्यासह त्याच्या सहाय्यकास अटक 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – अंधेरी येथील कामगार रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवा प्रकणी इमारत बांधणाऱ्या सुप्रीम कन्स्ट्रक्शनच्या मुख्य अभियंत्यासह त्याच्या सहाय्यकास एमआयडीसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. एमआयडीसी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना बेड्या ठोकल्या असल्याचे समोर आले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची, सुप्रीम कन्स्ट्रक्शनचा मुख्य अभियंता निलेश मेहता आणि त्याचा सहाय्यक नितीन कांबळे अशी नावे आहेत. महत्त्वाचे म्हणजे अद्याप रुग्णालयाचे काही बांधकाम देखील शिल्लक असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली आहे. मआयडीसी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०४ – अ अन्वये गुन्हा या दोघांविरोधात दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

मुंबईतील अंधेरी एमआयडीसी भागातील कामगार रुग्णालयात पुन्हा एकदा आग लागल्याची घटना समोर आली आहे. आजच(बुधवार)  ही घटना समोर आली आहे. सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजत आहे.  रुग्णालयातील मीटर बॉक्सला ही आग लागल्याचे सांगण्यात येते आहे. अग्निशामक दलाचे ३ बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. दरम्यान, सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. यात ९ जणांचा बळी गेला होता.  तर जवळपास १४० जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच तीन दिवसातच ही दुसरी घटना समोर आली आहे.

अग्नितांडवास रुग्णालय जबाबदार 
दरम्यान या अग्नितांडवास कामगार रुग्णालयाचा गलथानपणा नडल्याने यास सर्वस्वी रुग्णालय जबाबदार असल्याचे समजत आहे. इतकेच नाही तर हॉस्पिटल प्रशासनाची अग्निरोधक यंत्रणा अद्ययावत नव्हती अशी माहितीही समोर आली आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये हॉस्पिटलकडे मुंबई महापालिकेच्या आपत्कालन विभागाने हॉस्पिटलमधील संपूर्ण यंत्रणेची माहिती मागितली होती. मात्र ही माहिती अद्यापही दिली गेली नाही. पालिकेने वारंवार विचारणा करुनही माहिती देण्यास टाळाटाळ झाल्याचे समजत आहे. धक्कादायक म्हणजे गेली दोन वर्ष हॉस्पिटलमधील स्टाफचं आपत्कालीन नियंत्रण/व्यवस्थापनाचे प्रशिक्षण झालेच नाही. हॉस्पिटल स्टाफला आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळायची हे माहितीच नसल्याने मोठं नुकसान झाल्याचं समजत आहे.