व्हॉट्सअ‍ॅपवरुन चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, परदेशी मुलीसह 17 जणींची सुटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी येथे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत रशियन मुलीसह नालासोपारा येथील मुलीची सुटका केली आहे. ही मुलगी मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईत आली होती. पोलिसांनी आठवड्यात केलेली ही चौथी कारवाई असून आत्तापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली असून 17 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या मुलींना चित्रपट आणि मालिकांमध्ये काम देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.

अंधेरी येथे करण्यात आलेल्या कारवाईत सोनी ऊर्फ प्रभा मंडी (वय-36 रा. नेहरुनगर, विलेपार्ले) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. सोनी ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मुलींचे फोटो पाठवत होती. ग्राहकाने मुलीची पसंती दर्शवल्यानंतर ती त्या ग्राहकाला हॉटेलची खोली भाड्याने घेण्यास सांगत होती. अंधेरी परिसरात सोनी अशा प्रकारे वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सोनी हिच्याशी संपर्क साधला. तिने पोलिसांना ग्राहक समजून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मुलींचे फोटो पाठविले. बनावट ग्राहकाने त्यातील रशियन आणि भारतीय मुलीची मागणी सोनीकडे केली.

सोनीने ग्राहकाला मोरोळ मेट्रो स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये खोली भाड्याने घेण्यास सांगितले. त्यानुसार बनावट ग्राहकाने खोली घेतली. पोलिसांनी या हॉटेल परिसरात सापळा रचून सोनी मुलींसह हॉटेलमध्ये येताच ताब्यात घेतले. ही कारवाई समाजसेवा शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांच्या पथकाने केली.

पोलिसांनी आठवड्याभरात वेश्याव्यवसायाच्या रॅकेटवर केलेली ही चौथी कारवाई आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. चित्रपट आणि मालिकांमध्ये कामाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायाला भाग पाडलेल्या 17 पीडित मुलींची सुटका केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/