‘या’ माजी मुख्यमंत्र्याच्या जवळचे IPS अधिकारी देशद्रोहाच्या आरोपावरून तडकाफडकी ‘निलंबीत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – आंध्र प्रदेश सरकारने शनिवारी रात्री पोलिस महासंचालक दर्जाचे आयपीएस अधिकारी एबी वेंकटेश्वर राव यांना देशद्रोहाच्या कृतीतून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याच्या आरोपाखाली निलंबित केले. त्यांच्यावरील हे आरोप राज्य गुप्तचर सेवेचे प्रमुख होते तेव्हापासूनचे आहेत. मुख्य सचिव नीलम साहनी यांनी पोलिस महासंचालक गौतम स्वंग यांच्या अहवालाच्या आधारे हा आदेश जारी केला. यात राव यांच्यावर सुरक्षा उपकरणांच्या खरेदी प्रक्रियेत ‘गंभीर भ्रष्टाचार’ असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

१९८९ बॅच चे आयपीएस राव यांना जगनमोहन रेड्डी सरकारने मागील वर्षीच इंटेलिजन्स प्रमुख पदावरून हटवण्यात आले होते. तेव्हापासून त्यांना पोस्टिंग देण्यात आलेली नाही. राव हे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचे जवळचे मानले जातात. एक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, राव यांनी एका परदेशी संरक्षण संस्थेला इंटेलिजन्स प्रोटोकॉल व पोलिस प्रक्रियेची माहिती दिली होती. राष्ट्रीय पातळीवरील परिस्थितीला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. संपूर्ण भारतीय पोलिस दलात इंटेलिजन्स प्रोटोकॉल मानक आहेत.

आरोपी अधिकाऱ्याने जाणूनबुजून केला भ्रष्टाचार

गोपनीय अहवालात सांगितले आहे की चौकशीत उघड झालेल्या तथ्यांच्या आधारे भ्रष्टाचार आणि अनियमिततेचे गंभीर पुरावे सापडले आहेत, जे की आरोपी अधिकाऱ्याने मुद्दामच केले होते.

अहवालात हे देखील सांगण्यात आले आहे की, राव यांनी अ‍ॅडव्हान्स सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड चे सीईओ राहिलेले चेतन साई कृष्णा यांना महत्वपूर्ण खुपीया माहिती आणि पाळत ठेवण्याकरीता इस्त्रायली संरक्षण उपकरण निर्माता आरटी इन्फ्लाटेबल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत मिलीभगत केली. कृष्णा हा राव यांचा मुलगा आहे. अहवालात असे देखील म्हटले आहे की, आरोपी अधिकारी आणि परराष्ट्र संरक्षण कंपनी यांच्यामध्ये थेट संबंध हा सिद्ध होतो आणि हे अखिल भारतीय सेवा नियम १९६८ च्या नियम ३ (अ) चे थेट उल्लंघन आहे.