जावयाच्या तोंडून सत्य ऐकलं, सासरे ‘डायरेक्ट’ पोहचले त्यांच कापलेलं मुंडकं घेवून पोलिस ठाण्यात

गोदावरी/ आंध्र प्रदेश : वृत्तसंस्था – दारुच्या नशेत धुंद असलेल्या जावयाच्या तोंडून सत्य ऐकल्यावर संतापलेल्या सासऱ्याने जावयाचा शिरच्छेद केला. त्यानंतर जावयाचं कापलेलं मुंडके घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले व गुन्ह्याची कबुली दिली. ही खळबळजनक घटना आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील धारा जगन्नाधापूरम गावात शनिवारी (दि.8) घडली आहे.

पल्ला सत्यनारायणा असे जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याचे नाव आहे. त्याने जावाई लाचचानाचा खून केला. लाचचानाचे सत्यनारायणा यांच्या मुलीसोबत लग्न झाले होते. पण दहा महिन्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या लग्नासाठी आपल्या मुलीचा खून केल्याची लाचचानाने कबुली दिल्यानंतर मी त्याचा खून केला असे सत्यनारायणा याने पोलिसांना सांगितले. असे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

लाचाचानाला दोन मुली आहे. आईच्या मृत्यू झाल्यापासून त्या आपल्या आजी-आजोबांकडे म्हणजे सत्यनाराणा याच्याजवळ रहात आहेत. मुलीच्या मृत्यूनंतर दहाव्या महिन्यातील एका विधी करायचा असल्याने सत्यानारायणा याने जावाई लाचाचानाला त्याच्या घरी बोलावून घेतले होते. लाचाचाना घरी आल्यानंतर त्याने दारुच्या नशेत दुसरे लग्न करण्यासाठी आपण पहिल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.

मी माझ्या दोन मुलींना सोबत घेऊन जायला आलो आहे. त्यांचा सुद्धा मी असाच खून करणार असल्याचे त्याने सत्यनारायणाला सांगितले. जावयाच्या तोंडून हे ऐकल्यानंतर चिडलेल्या सत्यानारायणाने धारदार तीक्ष्ण हत्यार उचलले व लाचाचानाचा शिरच्छेद केला. त्यानंतर तो जावयाचं मुंडकं घेऊन पोलीस ठाण्यात पोहचला. पोलीस ठाण्यात येऊन त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली.