दुर्देवी ! अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या 6 युवकांचा बुडून मृत्यू

विशाखापट्टणम : पोलीसनामा ऑनलाइन –  आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरी परिसरात नदीवर अंघोळीला गेलेल्या ६ मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हे सर्व मुले साधारणपणे १५ ते १७ वयोगटातील असल्याचे समजत आहे. सर्व मुले अंघोळ करण्यासाठी नदीवर गेली होती. मात्र, ती पुन्हा घराकडे आलीच नाहीत.

घडलेल्या घटनेमुळे गावात शोकाकुल वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी ६ युवकांचे मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर ते शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आले. मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, युवक अंघोळीसाठी पाण्यात उतरले होते. तत्पूर्वी मुसळधार पाऊस पडल्याने नदीचे पाणी अचानक वाढले व त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह सुद्धा वेगाने वाढू लागल्याने युवक बुडू लागले. त्यातील काही जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण यात ६ युवकांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामे करुन मृतदेह शविच्छेदनसाठी पाठवण्यात आले. पुढील तपास सुरु आहे.