आंध्रात चंद्रबाबूंना धक्का, संध्याकाळी देणार राजीनामा

हैद्राबाद : वृत्तसंस्था – केंद्रामध्ये तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात असलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रीत झाल्या. लोकसभेच्या २५ जगांवर आंध्रात मतदान झाले असून टीडीपीला फक्त एका जागेवर आघाडी मिळाली आहे. तर विधानसभेच्या १७५ पैकी केवळ २९ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे सत्ता जातेय हे लक्षात आल्यानंतर चंद्राबाबू नायडू हे संध्याकाळी राजीनामा देणार आहेत.

आंध्र प्रदेशातील निकालावरून जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेसने टीडीपीला क्लिन स्वीप करताना दिसत आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही चंद्राबाबू यांना सपाटून मार खावा लागल्याने त्यांचे मुख्यमंत्री पद गेले आहे. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूकीत चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पार्टी पक्षाला २५ जागांवर आघाडीवर आहे तर वायएसआर काँग्रेस १४९ जागांवर आघाडीवर आहे. तर जनसेना पार्टीला फक्त एकाच जागेवर आघाडी मिळवता आली आहे.

सकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर लोकसभेच्या जागांवर २५ पैकी २४ जागांवर वायएसआर काँग्रेस आघाडी मिळाली. तर विधानसभेच्या १७५ जागांपैकी १४५ जागांवर वायएसआरने आघाडी घेतली आहे. तर टीडीपीने केवळ २९ जागांवर आघाडी घेतली आहे. टीडीपीला मिळत असलेले अपयश पाहता वायएसआर काँग्रेसची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू हे संध्याकाळी राजिनामा देण्याची शक्यता आहे.