चंद्रबाबु नायडूंना मोठा ‘झटका’ ! जगनमोहन रेड्डीकडून ‘अलिशान’ बंगला ‘जमिनदोस्त’ करण्याचा आदेश

नवी दिल्ली, वृत्तसंस्था –आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या बंगल्यावरच घाव घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी ‘प्रजा वेदिका’ ही बिल्डींग तोडण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारपासून बिल्डींग तोडण्याचे काम सुरु होईल. सध्या प्रजा वेदिका या बिल्डींगमध्ये चंद्रबाबू नायडू राहत आहेत. काही दिवसांपूर्वी चंद्रबाबू नायडू यांनी जगन मोहन रेड्डी यांना चिट्टी लिहून प्रजा वेदिका या बिल्डींगला विरोधीपक्ष नेत्याचे सरकारी निवास घोषित करावे अशी मागणी केली होती.

बदल्याच्या भावनेने कारवाई केल्याचा आरोप –
वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सरकारने मात्र शनिवारी एन चंद्रबाबू नायडू यांच्या अमरावतीतील निवास ‘प्रजा वेदिका’ आपल्या ताब्यात घेतला आहे. या कारवाई नंतर तेलगू देसम पक्षाने सरकार बदल्याच्या भावनेने हे करत असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षाने आरोप केला की, सरकारला माजी मुख्यमंत्र्यांप्रती कोणतीही सदभावना नाही, कारण त्यांनी माजी मुख्यमंत्र्यासमोर अमरावतीतील उंदावल्ली येथील त्यांच्या घरातून बाहेर काढले.

चंद्रबाबू नायडू कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या उंदावल्लीमधील निवासात तेव्हापासून राहतात, जेव्हा आंध्रप्रदेशने आपले प्रशासन हैद्रबादमधून अमरावतीत हलवले. प्रजा वेदिकाचे बांधकाम सरकारने आंध्रप्रदेशात राजधानी प्रदेश क्षेत्र विकास प्रधिकरणाअंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री निवास स्थान म्हणून बांधण्यात आले होते. या निवास स्थानाची किंमत 5 कोटी रुपये आहे आणि याचा वापर पक्षाच्या बैठका घेण्यासाठी करण्यात येत असतं.

कारवाईबाबत माहिती दिली नाही –
टीडीपी नेता आणि विधान परिषदेचे सदस्य अशोक बाबू यांनी सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांनी नायडू यांना घराबाहेर काढत त्याचे खासगी सामान घराबाहेर फेकले. सरकारने या करावाई बाबत आधी कोणतीही माहिती दिली नव्हती. नगरपालिका मंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी टीका केली की, नायडू यांना तशीच वागणूक दिली जाईल जशी वागणूक जगन मोहन रेड्डी विरोधी पक्ष नेता असताना देण्यात येत होती.

आरोग्य विषयक वृत्त

केरळमध्ये निपाहचा रुग्ण, २३ वर्षाच्या विद्यार्थ्याला लागण

‘होमिओपॅथी’ औषधींमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते

‘बीडीओं’ ना असणार बालसंगोपन रजा मंजुरीचे अधिकार, संभ्रम दूर

ज्येष्ठ नागरिकाचे अवयवदान ; यकृत पुण्यात तर दोन्ही मूत्रपिंड मुंबईत

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like