आंध्रात NRC-CAA लागू होणार नाही : CM जगन मोहन रेड्डी

तिरुपती : वृत्तसंस्था – देशात NRC आणि CAA हे लागू केल्याने देशातील अनेक भागातून त्याला विरोध होत आहे. राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, तामिळनाडूसह नऊ राज्यात नागरिकत्व कायदा लागू होणार नाही अशी भूमिका त्या-त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. यानंतर आता आंध्र प्रदेशातही हा कायदा लागू होणार नाही, अशी माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1209097450759131137.

देशात नागरिकत्व संशोधन कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स विरोधात आंदोलने सुरु आहेत. त्यातच काही राज्यांनी हा कायदा लागू करणार नसल्याचे जाहिर केले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी आज स्पष्ट शब्दात हे दोन्ही कायदे लागू होणार नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री रेड्डी यांनी कडप्पा मधील एका सभेला संबोधित करताना ही घोषणा केली.

यावेळी बोलताना रेड्डी म्हणाले, माझे सरकार NRC च्या विरोधात आहे. आम्ही हा कायदा राज्यात लागू करणार नाही. या आधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा कायदा लागू करणार नाही, असे स्पष्ट केले होते. NRC ला विरोध करताना नितीश कुमार म्हणाले होते, कशाचे एनआरसी ? अजिबात लागू होणार नाही. एनडीएमधील घटक पक्ष असलेले नितीश कुमार हे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी थेट एनआरसी लागू करणार नसल्याचे म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/