CM जगन रेड्डींनी ‘हैद्राबाद एन्काऊंटर’वर दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनी हैद्राबाद एन्काऊंटवर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री के चंद्रशेकर राव आणि तेलंगना पोलिसांचं कौतुक केलं आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत चर्चेदरम्यान सीएम जगन रेड्डी म्हणाले, “मी देखील मुलींचा बाप आहे. मला एक बहिण आणि पत्नीही आहे. जर माझ्या मुलींना काही होत असेल तर एक वडिल म्हणून माझी प्रतिक्रिया काय असेल ? मला काय हवे असेल ? त्वरीत न्याय मिळवण्यासाठी कायद्यात बदल होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

तेलंगनाच्या राजधानीत एका लेडी वेटनरी डॉक्टर सोबत सामूहिक अत्याचार आणि हत्येची घटना घडल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रंगारेड्डी जिल्ह्याच्या शादनगर जवळ झालेल्या चकमकीत चारही आरोपींचा एन्काऊंट करण्यात आला. पोलिसांनी म्हटलं की, आरोपींनी पोलिसांकडून हत्यार हिसकावत त्यांच्यावर फायरींग केली. ज्यामुळे पोलिसांना प्रत्युत्तर देत कारवाई करवी लागली. ज्यात चारही आरोपींना ठार मारण्यात आलं.

सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांनी पत्रकारांना सांगितलं की, “10 सदस्यांची पोलीस टीम आरोपींना सकाळी 5.45 वाजता घटनास्थळी घेऊन गेली होती. आरोपींनी इथेच पीडितेला जाळल्यानंतर मोबाईल आणि इतर सामग्री लपवली होती जी शोधण्यासाठी पोलिस त्यांना इथे घेऊन आले होते. यावेळी आरोपींनी हत्यार हिसकावत पोलिसांवर फायरींग केली. यानंतर पोलिसांकडून आरोपींचा खात्मा करण्यात आला.

Visit : Policenama.com