‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

हैदराबाद : वृत्त संस्था – चुलत नात्यात विवाह करण्यास मनाई असल्याची आपल्याकडे परंपरा आहे. अनेक जाती जमातीमध्ये अशा प्रकारच्या विवाहाला मान्यता दिली जात नाही. एका अल्पवयीन मुलीचे तिच्या चुलत भावावर प्रेम होते. या चुलत भावडांमधील प्रेमाला घराच्या नातेवाईकांनी विरोध केल्याने दोघांनी आपले आयुष्य (Suicide)संपविले.

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील वेंकटपुरम गावात ही घटना घडली आहे. पेरुबोईना साई कुमार (वय २२) हा मोपीदेवी मंडळमधील वेंकटपूरम या गावात ग्रामसेवक म्हणून काम करत होता. त्याच गावात पेरुबोइना मोनिका (वय १५) ही १०वीमध्ये शिकत होती. दोघेही चुलत भाऊ बहिण होते. एकाच गावात रहात असल्याने ते एकमेकांशी नियमित भेटत असत.

जर सतत लागत असेल तहान तर सावध व्हा, होऊ शकतात ‘हे’ 3 गंभीर आजार; जाणून घ्या त्यावरील 5 उपाय

त्यातून त्यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले. याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना समजल्यावर त्यांनी दोघांना झापले व अशाप्रकारे तुमच्या प्रेमसंबंधाला मान्यता मिळणार नाही, असे सांगितले. आपण एकत्र येऊ शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आले. पण, त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यामुळे शनिवारी रात्री दोघेही गावातून पळून गेले. दोघेही बेपत्ता असल्याची माहिती रविवारी सकाळी त्यांच्या कुटुंबियांना समजली. त्याबरोबर त्यांचा शोध सुरु झाला. वेंकटपूरम गावाजवळील पेडाकल्लेपल्ली गावाबाहेर दुपारी त्यांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी आकस्मित मृत्यु अशी नोंद केली आहे.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’