खळबळजनक ! आंध प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांची गळफास घेऊन आत्महत्या, विधीमंडळातील फर्निचर मुलाला दिल्याचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष कोडेला शिव प्रसाद राव यांनी आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोडेला शिव प्रसाद राव यांनी आपल्या राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर बेशुद्धावस्थेत त्यांना हैदराबाद मधील इंडो अमेरिकन कँसर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलगू देसम पार्टीचे नेते कोडेला शिवप्रसाद राव हे मागील काही दिवसांपासून मानसिकरीत्या आजारी होते. अनेक दिवस ते डिप्रेशनमध्ये देखील होते. त्यामुळे त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांच्यावर आपल्या मुलाला विधानसभेतील फर्निचर विकल्याचे देखील आरोप करण्यात आले होते. त्यामुळे देखील त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Loading...
You might also like