कोरोनावर चमत्कारी औषधाचा दावा करणाऱ्या माजी मुख्याध्यापकाचा कोरोनानेच मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा Corona संसर्ग वेगाने पसरत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक जण उपचार शोधत आहे. अनेकांनी कोरोनावरील उपचारासंदर्भात दावा केला आहे. कोणी गोमूत्राचा सल्ला देत आहे तर कोणी आयुर्वेदावर विश्श्वास ठेवण्यास सांगत आहे. असेच काही दिवसापूर्वी आंध्र प्रदेशमधील नेल्लोर  मधील एका माजी मुख्याध्यपकाने चमत्कारी औषध घेतल्याने कोरोनातून बरा झाल्याचा दावा केला होता मात्र आता मुख्याध्यापकाचाच मृत्यू झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे या माजी मुख्याध्यापकांचा मृत्यू हा कोरोनाने Corona झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एन. कोटैया असे त्यांचे नाव आहे.

Supriya Sule : शरद पवारांनी दिलेला दिल्लीबाबतचा ‘तो’ सल्ला कायम लक्षात ठेवते

काही दिवसांपूर्वी नेल्लोरे य़ेथील कृष्णपटणम गावातील एन कोटैया यांनी कोरोनावर औषध घेतल्याचा दावा केला होता. या दाव्याला बी. आनंदैया यांनी तयार केलेल्या आयुर्वेदीक अंजनाचा आधार दिला होता. हि बातमी सर्वत्र पसरताच लोकांनी औषध खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान शुक्रवारी रात्री एन कोटैया यांची ऑक्सिजन लेव्हल खालावल्याने त्यांना नेल्लोरमधील शासकीय जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.

कोरोनावरील Corona चमत्कारी औषधाचा दावा करणाऱ्या आयुर्वेदिक चिकित्सक आनंदैया यांच्या टीममधील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली असता तीन जण बाधित आढळले. त्याचबरोबर २० नागरिकांमध्येहि लक्षणे आढळल्याने त्यांचीही तपासणी करून नुमने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आयुर्वेदिक चिकित्सक आनंदैया यांनी केलेला दावा सोशल मीडियावर व्हयरला झाला आहे. त्यामुळे हे औषध घेण्यासाठी अनेक आहेत.

आंध्रप्रदेशात कोरोनाच्या आयुर्वेदिक औषधासाठी उडाली झुंबड
एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार आनंदैया यांच्याकडुन औषध घेण्यासाठी दूरवरून अनेक लोक येत आहेत. विशेष म्हणजे आनंदैया हे हे औषध मोफत देत आहेत. ज्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना आयड्रॉपदेखील दिला जात आहे. मात्र, आयुर्वेदिक औषधाने कोरोना बरा होतो याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. असे असूनही हे औषध खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. औषध घेण्यासाठी आलेल्या एकाला यासंदर्भात विचारले असता तो म्हणाला, रुग्णांना श्वास घयायला त्रास होत आहे. त्यांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, नातेवाइकांची नुसती पळापळ सुरु आहे. यामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. आम्हाला आशा आहे, की औषध उपयोगी ठरेल. त्यामुळे याचा प्रयोग करणे काही वाईट नाही. आयुष आयुर्वेदचे डॉक्टर या औषधाची तपासणी करत आहेत.

नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती आहे. अनेक निर्बंध लागू केले आहेत. मात्र असे असूनही आंध्र प्रदेशमध्ये पूर्वेकडील गोदावरी जिल्ह्यात नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे. देवी नाराज झाली, देवीचा कोप झाला असं म्हणत देवीला आनंदी करण्यासाठी आणि तिची माफी मागण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या ग्रामस्थांच्या मते, देवीचा कोप झाल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे आम्ही प्रार्थनेसाठी एकत्र जमलो असल्याचे सांगितले. दरम्यान, पूर्व गोदावरी भागाचे पोलीस अधीक्षक नयीम असीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवीचा कोप झल्याने हे सर्व घडत आहे असा येथील लोकांचा समज आहे. त्यामुळे देवीला खुश करण्यासाठी लोक एकत्र आले.

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, Gold 50000 रूपयांच्या जवळ तर Silver 72 हजारांवर

Health in Your Hands : Corona सह गंभीर आजारांचा संकेत देतात तुमचे हात, असा घ्या शोध

Pune : पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कर्मचारी आणि त्याच्या भावाकडून Covid केअर सेंटरमधील डॉक्टरला चौकीत घुसून मारहाण, प्रचंड खळबळ

Coronavirus Vaccination : कोविड-19 व्हॅक्सीनच्या साईड-इफेक्ट्सपासून आराम देऊ शकते का नारळपाणी?, जाणून घ्या

नारायण राणेंची मराठा समाजासाठी मागणी, म्हणाले – ‘3 हजार कोटींचे पॅकेज द्या’

केमिकल टँकर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू