धक्‍कादायक ! पाण्यासाठी लाईनमध्ये उभ्या असलेल्या महिलांमध्ये हाणामारी, मारहाणीत एकीचा मृत्यू

हैदराबाद : वृत्तसंस्था – जगातील वाढते तापमान आणि त्याचा पाण्यावर होणारा परिणाम हे सर्वांनाच माहिती आहेत. पाण्यावरून बायकांची होणारी भांडणे आपण सर्वांनीच पाहिले असेल, पण पाण्यावरून झालेल्या भांडणात कधी कोणत्या महिलेचा जीव गेलेला नाही. मात्र पाण्यावरून झालेल्या भांडणात एका महिलेचा मृत्यू झाला हे नवलच वाटेल. आंध्रप्रदेश मध्ये सोमवारी अशी घटना घडली आहे. पाणी भरण्यासाठी लाईनमध्ये उभ्या राहिलेल्या महिलांमध्ये भांडण झाले. ते एवढे वाढले की या भांडणात एका महिलेचा जीव गेला आहे.

आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यात सोमवारी सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी महिला लाईनमध्ये उभ्या होत्या. त्यात लाईन तोडल्याच्या कारणावरून दोन महिलांच्या समुहात भांडणे झाली. या भांडणात ३८ वर्षांच्या तातीपुडी पद्मा यांच्यावर काही महिलांनी हल्ला केला, त्यात त्यांचा जीव गेला. या महिलांनी स्टीलच्या भांड्यानी पद्मा यांना मारले त्यात त्यांच्या जीव गेला, असं तेथील काही लोकांचे म्हणणे आहे.

घडलेल्या प्रकारावरून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयएएनएस या न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार पोलीसांनी सुंदरम्मा नामक महिलेला ताब्यात घतले आहे. घडलेल्या प्रकारावरून तेथील वातावरणात भीती आहे. पाण्यावरून झालेल्या बायकाच्या भांडणाचत एकीचा जीव जाणे यावर पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत.

दरम्यान, आंध्रा मधील अनेक भागात अद्यापही मान्सूनचे आगमन झालेले नाही. त्यामुळे तेथे अद्यापही पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक सामस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी