हैदराबाद : वृत्तसंस्था
आंध्र प्रदेशमधील टीडीपी पक्षाचे आमदार किदारी सर्वेश्वर आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. माओवाद्यांकडून या दोन्ही आमदारांना गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. विशाखापट्टनम येथील अराकू प्रदेशात या आमदारांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने आंध्र प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a656610b-bf14-11e8-b6ac-7d4366dcc8dd’]
ही घटना विशाखापट्टणम पासून १२५ किलोमीटर अंतरावर असलेल्या थुतंगी येथे घडली आहे. के. सर्वेश्वर राव हे टीडीपीचे अरकू मतदारसंघाचे आमदार आहेत. राव आणि माजी आमदार एस. सोमा हे मतदारसंघात आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी जात असताना माओवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते दोघेही जागीच ठार झाले.
आमदार राव यांच्या हत्येच्या घटनेबद्दल आंध्र प्रदेश विधानसभा सभापती डॉ. कोडेला शिवप्रसाद राव यांनी दुखः व्यक्त केले आहे. तर आदिवासी कल्याण मंत्री नाक्का आनंद बसू यांनी या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला आहे.
[amazon_link asins=’B077B3MXKW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ac42305c-bf14-11e8-bc23-27bfadace368′]
आंध्र प्रदेशातील ग्रामीण भागात माओवाद्यांनी १४ वा माओवादी फाउंडेशन दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. याच दरम्यान माओवाद्यांनी दोघा नेत्यांची हत्या केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळवण्यासाठी के. सर्वेश्वर राव प्रयत्न करत होते.