काय सांगता ! होय, चक्क जावाई येणार असल्याच्या आनंदात सासुबाईंनी सजवली 67 मिष्ठान्नाची प्लेट, व्हिडीओ पाहून व्हाल चकित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सासू आणि जावई यांचे नाते खूप खास असते. नातं विशेष असणे गरजेचे आहे, शेवटी, तो तिच्या मुलीचा नवरा असतो. एखादा जावई घरी आला की सासू त्याच्या खातिरदारीसाठी घराला वेगवेगळ्या प्रकारे सजावते, घरात विविध प्रकारची मिठाई आणि पदार्थ बनवते. आजकाल अशाच एका सासूचे तिच्या जावयावरच्या प्रेमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आंध्र प्रदेशातील एका महिलेने आपल्या जावयाच्या स्वागतासाठी एक खास प्लेट तयार केली. आता ही प्लेट सोशल मीडियावर प्रत्येकाच्या पसंतीस पडली आहे आणि लोक हे पाहून वेगवेगळ्या कमेंट करत आहे.

https://twitter.com/rananth/status/1280784332144013312

या डिशमध्ये महिलेने एक- दोन किंवा 10 पदार्थ नसून 67 डिशेस बनवल्या आहेत. या महिलेने जावयासाठी बनविलेली खास प्लेट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही प्लेट पाहून सोशल मीडिया युजर्सच्या तोंडाला पाणी येत आहे. आपण ही खास प्लेट देखील पाहू शकता…

https://twitter.com/rananth/status/1280784332144013312

महिलेने ही प्लेट पोस्ट केल्यावरच टिप्पण्यांचा पूर येत आहे. एका युजर्सने कमेंट केली की, आपल्याला दुसरी मुलगी आहे का? मला तिच्याशी लग्न करायचं आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजर्सने लिहले की, जावई खूप भाग्यवान आहे. ट्विटर यूजर अनुराग गुप्ता म्हणाले की, त्यांचा जावई एनआरआय असल्यासारखे दिसते आहे.