Andrew Symonds Death | जेव्हा अँड्रयू सायमंड्सच्या जीवनात IPL मधून मिळालेल्या अमाप संपत्तीने पेरले विष, जवळचा मित्रच बनला शत्रू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Andrew Symonds Death | ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अँड्रयू सायमंड्सचा (Andrew Symonds) शनिवारी रात्री कार अपघातात मृत्यू झाला (Andrew Symonds Dies In Car Crash) . या अपघातामुळे क्रिकेट जगताला धक्का बसला आहे (The World Of Cricket Was Shocked). वयाच्या 46 व्या वर्षी जगाचा निरोप घेणार्‍या सायमंड्सला त्याचा एकेकाळचा जवळचा मित्र मायकल क्लार्कसोबतचे (Michael Clarke) नाते बिघडल्याने नेहमी खेद वाटला. मैत्री तुटली आणि याचे कारण भांडण नसून आयपीएलमध्ये Indian Premier League (IPL) मिळालेला पैसा होता. (Andrew Symonds Death)

 

मृत्यूच्या काही दिवस आधी सायमंड्सने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कवर अनेक गंभीर आरोप केले होते. कर्णधार झाल्यानंतर त्याचा मित्र कसा बदलला आणि जेव्हा त्याला आयपीएलमध्ये अमाप संपत्ती मिळाली (Andrew Symonds Got Immense Wealth In IPL) तेव्हा हे नातेही तुटल्याचे त्याने सांगितले होते. एक वेळ अशी आली जेव्हा संघाचा हंगामी कर्णधार मायकेल क्लार्कने टीम मीटिंगमधून बाहेर पडताना सायमंड्सला फिशिंग करण्याच्या कारणामुळे संघातून वगळले. (Andrew Symonds Death)

 

2015 मध्ये अष्टपैलू सायमंड्सने क्लार्कवर जोरदार टीका केली होती. ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने आरोप केला होता की सायमंड्स ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मद्यधुंद अवस्थेत आला होता. आता ’द ब्रेट ली पॉडकास्ट’ (The Brett Lee Podcast) वर, अँड्रयू सायमंड्स स्वतःच्या आणि क्लार्कच्या नात्याबद्दल भाष्य केले.

माजी अष्टपैलू खेळाडू म्हणाला होता –
आयपीएलच्या पहिल्या सत्राच्या लिलावात मोठी रक्कम मिळाल्याने क्लार्कला त्याचा हेवा वाटू लागला. तो म्हणाला होता, ’जेव्हा क्लार्क संघात आला तेव्हा मी त्याच्यासोबत खूप फलंदाजी करायचो. त्यामुळे मी त्याची खुप काळजी घेतली. यामुळे आम्ही जवळ आलो. मॅथ्यू हेडनने मला सांगितले होते की, जेव्हा आयपीएल सुरू झाले तेव्हा मला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खूप पैसे मिळाले. यामुळे क्लार्कला हेवा वाटू लागला आणि तो पैसा आमच्या नात्यात आला.

 

सायमंड पुढे म्हटले होते की, पैसा मजेदार गोष्टी करतो. तो चांगली गोष्ट आहे परंतु तो विष असू शकतो आणि मला वाटते की त्याने आमच्या नात्यात विष पेरले आहे.
माझी आता त्याच्याशी मैत्री नाही आणि मला ते सोयीस्कर आहे, पण मी इथे बसून चिखलफेक करणार नाही.
आयपीएलच्या पहिल्या सत्रातील लिलावात महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
त्याच वेळी, अष्टपैलू अँड्रयू सायमंड्स हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
त्याला हैदराबाद डेक्कन चार्जर्सने1.35 मिलियन डॉलर देऊन विकत घेतले होते.

 

Web Title :- Andrew Symonds Death | andrew symonds death know how ipl was reason to separation with michael clarke

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sangli Crime | कौटुंबिक वादातून सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून; मेहुणा पोलिसांच्या ताब्यात

 

Itching And Rashes Problem In Summer | उन्हाळ्यात त्वचेला खाज-जळण्याची समस्या वाढते, ‘हे’ उपाय अत्यंत प्रभावी; जाणून घ्या

 

Pune Crime | फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून 36 वर्षीय शिक्षीकेबाबत अश्लील मजकूर प्रसारित, कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा