Andrew Symonds Dies In Car Crash | 46 वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यु

मेलबर्न : Andrew Symonds Dies In Car Crash | ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडु अँड्यु सायमंड्स (वय ४६) याचा कार अपघातात मृत्यु झाला. महान खेळाडु शेन वॉर्न आणि रॉड मार्श यांच्या मृत्युनंतर आणखी एका खेळाडुचा मृत्युने क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. (Andrew Symonds Dies In Car Crash)

 

अँड्यु सायमंड्स शनिवारी रात्री क्वीन्सलँड राज्यातील टाऊन्सविलेच्या उपनगरातून कारने जात होते. कारवरील नियंत्रण सुटल्याने तिने रस्त्याच्या कडेला जाऊन तिचा अपघात झाला. एलिस नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी पोहोचलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. सर्व प्रयत्न करुनही डॉक्टरांना त्याला वाचविता आले नाही.

 

अँड्यु सायमंडस हा १९९८ ते २००९ पर्यंत ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी आणि १९८ एक दिवसीय सामने खेळला आहे. ऑस्ट्रेलियाने २००३ आणि २००७ मध्ये विश्वचषक जिंकला होता. या विजयात अँड्यु सायमंडस याचा महत्वाचा वाटा होता.

देशांतर्गत, तो १७ हंगाम क्वीन्सलँडकडून खेळला, तर इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ग्लुसेस्टरशायर, केंट, लँकेशायर आणि सरे आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्ससाठी खेळला.

 

सायमंड्स हा दारूच्या आहारी गेला होता. दारुसह शिस्तभंगाच्या कारणावरुन त्याला तीनदा संघाबाहेर काढण्यात आले होते.
जून २००९ मध्ये त्याला टी २० विश्वचषकामधून मायदेशी पाठवण्यात आले होते.
सायमंड्सच्या वागण्यामुळे अनेकदा संघ अडचणीत आला होता.
वांशिक टिपण्णीवरुन सायमंड्स आणि हरभजनसिंग यांच्या वाद झाला होता.

 

६ फेब्रुवारी २०१२ रोजी सायमंड्स याने आपल्या कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नात
सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

 

Web Title :- Australian Cricket Star Andrew Symonds Dies In Car Crash

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा